टी२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर दिग्गजांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. १९८३ मध्ये भारताला पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे कॅप्टन कपिल देव एबीपी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी भारतीय संघाच्या पराभवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कपिलच्या म्हणण्यानुसार, संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण त्यांची मानसिकता आहे कारण टी२० हा ज्या प्रकारे खेळ आहे, भारतीय संघ त्या पद्धतीने खेळू शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कपिल म्हणाला, “संघाची मानसिकता बदलली पाहिजे कारण या फॉरमॅटमध्ये तुम्हाला बेफिकीरपणे क्रिकेट खेळावे लागेल. इंग्लंडबद्दल बोलायचे तर त्यांच्या खेळाडूंची मानसिकता तशी तयार करण्यात आली आहे. ते आक्रमक फटके खेळण्यास अजिबात घाबरत नाहीत. इंग्लंड संघांच्या १०० धावा झाल्या तरी त्यांनी फटके मारणे कमी केले नाही. हा मुलभूत बदल त्यांनी त्यांच्या खेळण्याच्या शैलीत अजिबात केलेला आहे. या टी२० क्रिकेटच्या प्रकारामध्ये तुम्हाला जर यश मिळवायचे असेल तर तुम्ह्लाला पारंपारिक पद्धतीने फलंदाजी करून चालणार नाही. तिथे तुम्हाला आक्रमक पद्धतीनेच फलंदाजी करणे आवश्यक आहे कारण ती आताच्या क्रिकेटची काळाची गरज आहे. क्रिकेट देखील जग बदलत तसं बदलत आहे. हे भारतीय संघातील खेळाडूंनी लवकरात लवकर समजून घेणे आवश्यक आहे.”

टी२० क्रिकेटची संपूर्ण रचनाच वेगळी: कपिल

आजच्या काळात खूप काही बदलले असले तरी संघाने वेगवेगळ्या फॉरमॅटनुसार तयारी करायला हवी, असेही कपिलचे मत आहे. तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळे खेळाडूंचे ग्रुप तयार करून संघ तयार केले पाहिजेत आणि जो संघात स्थान मिळवण्यास पात्र नाही त्याला काढून टाकण्यासाठी कठोर निर्णयही घेतले पाहिजेत.

हेही वाचा :  T20 World Cup 2022: पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने विराट कोहलीच्या संथ खेळीवर केली टीका 

एबीपी न्यूजशी संवाद साधताना कपिल देव म्हणाले की, “आम्ही जेव्हा पहिल्यांदा विश्वचषक जिंकलो तेव्हापासून आतापर्यंतच्या क्रिकेटमध्ये जमीन-आसमानाचा फरक पडला आहे. आता तुम्हाला कशाचीही कमतरता नाही. कमतरता तुमच्याकडे पैसा आहे म्हणून नाही. पैशापेक्षा खूप काही. सर्व चांगल्या गोष्टी येतात, पण मैदानावर चांगली बांधिलकी दाखवावी लागेल. आज तुम्हाला चांगले प्रशिक्षक मिळू शकतात. टी२० क्रिकेटची संपूर्ण रचना वेगळी आहे आणि तुम्हाला ती आणावी लागेल. बीसीसीआयने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.”

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former indian fast bowler kapil dev expressed the opinion that the indian team did not play as expected in the t20 world cup avw
Show comments