T20 World Cup 2024 Super 8 Schedule Updates : अमेरिका आणि वेस्ट इंडीज यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला टी-२० विश्वचषक २०२४ आता सुपर ८ फेरीत पोहोचला आहे. ग्रुप स्टेजचे ३८ सामने खेळले गेले आहेत. आज ३९ वा सामना न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे, तर १८ जूनला वेस्ट इंडिजचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. मात्र, या दोन्ही सामन्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. सुपर ८ चे आठ संघ निश्चित झाले आहेत. सुपर ८ फेरी १९ जूनपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी या फेरीत कोणत्या संघाने स्थान पटकावले असून त्याचा सामना कोणत्या संघाविरुद्ध आहे? जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुपर ८ चे आठ संघ निश्चित –

सुपर ८ चे आठ संघ निश्चित झाले आहेत. या टी-२० विश्वचषकातही काही मोठे अपसेट पाहायला मिळाले आहेत. अफगाणिस्तानने न्यूझीलंडसारख्या मोठ्या संघाला पराभू तकेले, तर अमेरिकेने पाकिस्तानवर मात केली. यावेळी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकासारखे काही माजी चॅम्पियन संघ सुपर ८ मध्ये दिसणार नाहीत. त्यांच्या जागी अमेरिका आणि अफगाणिस्तानसारख्या नव्या संघांनी आपले स्थान निर्माण केले आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, अमेरिका, इंग्लंड आणि बांगलादेश हे संघ सुपर ८ साठी पात्र ठरले आहेत.

सुपर ८ फेरी १९ जूनपासून सुरू होणार –

सुपर ८ फेरीची सुरुवात १९ जून रोजी अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने होईल. या फेरीत दोन गट आहेत. एका गटातील एक संघ तीन सामने खेळेल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर ८ फेरीचे सीडिंग स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच निश्चित झाले होते. उदाहरणार्थ, जर भारत सुपर-8 साठी पात्र ठरला असता, तर ते कदाचित त्यांच्या गटात दुसरे स्थान मिळवले असते, परंतु त्यांना A1 मानले गेले असते.

हेही वाचा – VIDEO : “बाबर आझमच्या जागी मी असतो तर राजीनामा दिला असता”, शोएब मलिकचे कर्णधाराबाबत मोठे वक्तव्य

त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांसाठी. ऑस्ट्रेलियन संघ त्यांच्या गटात B1 अव्वल आहे, परंतु B2 रेट केला आहे. उपांत्य फेरीचे सामने २६ आणि २७ जून रोजी आणि अंतिम सामना २९ जून रोजी बार्बाडोस येथे खेळवला जाईल. आम्ही तुम्हाला सुपर ८ च्या वेळापत्रकाबद्दल जाणून घेऊयात.

टी-२० विश्वचषकातील सुपर-८ फेरीचे वेळापत्रक :

अमेरिका विरुद्ध दक्षिण आफ्रिका – १९ जून रात्री ८ वाजता अँटिग्वा
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज – २० जून सकाळी ६ वाजता, सेंट लुसिया
अफगाणिस्तान विरुद्ध भारत – २० जून रात्री ८ वाजता, बार्बाडोस
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश – २१ जून सकाळी ६ वाजता, अँटिग्वा
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका – २१ जून रात्री ८ वाजता, सेंट लुसिया
यूएसए विरुद्ध वेस्ट इंडीज – २२ जून, सकाळी ६ वाजत, बार्बाडोस
भारत विरुद्ध बांगलादेश – २२ जून रात्री ८ वाजता, अँटिग्वा
अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया – २३ जून सकाळी ६ वाजता, सेंट व्हिन्सेंट
यूएसए विरुद्ध इंग्लंड – २३ जून रात्री ८ वाजता, बार्बाडोस
वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका – २४ जून रोजी सकाळी ६ वाजता, अँटिग्वा
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत – २४ जून रात्री ८ वाजता, सेंट लुसिया
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश – २५ जून सकाळी ६ वाजता, सेंट व्हिन्सेंट

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Full super 8 schedule confirmed as india start on june 20 against afghanistan team in t20 world cup 2024 vbm