भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टी२० विश्वचषकादरम्यान भारताच्या सामन्यांचा सिनेमागृहात चाहते आनंद घेऊ शकणार आहे. आयनॉक्सच्या मल्टिप्लेक्समध्ये टीम इंडियाचे सामने दाखवले जातील. यासाठी आयनॉक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (आयसीसी) करार केला आहे. आयनॉक्स लीझर लिमिटेडने ही माहिती दिली. १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषकाला सुरुवात होत आहे. भारताचे सर्व सामने सिनेगृहात देखील प्रसारित केले जातील, चाहत्यांना २५ शहरांमध्ये ही सुविधा मिळेल. क्रिकेट चाहत्यांना मोठ्या पडद्यावर भारताच्या सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करारानुसार भारतीय संघाचे सर्व गट सामने आयनॉक्सच्या मल्टिप्लेक्समध्ये प्रसारित केले जातील. टीम इंडिया २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. गट सामन्यांव्यतिरिक्त, उपांत्य फेरी आणि अंतिम सामने देखील आयनॉक्सवर दाखवले जातील. “टीम इंडियाचे सर्व सामने देशभरातील २५ हून अधिक शहरांमधील आयनॉक्सच्या मल्टिप्लेक्समध्ये प्रसारित केले जातील,” असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

आयनॉक्स लीझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद विशाल म्हणाले, “थिएटरमध्ये क्रिकेटचे स्क्रीनिंग करून, आम्ही आमच्या देशातील सर्वात प्रिय खेळ, क्रिकेटसह प्रचंड स्क्रीन अनुभव आणि आवाजाचा थरार एकत्र आणत आहोत. टी२० चा उत्साह आणि उत्साह. विश्वचषक. भावना वाढतील.”

आयनॉक्सच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, “सिनेगृहात क्रिकेटची स्क्रीनिंग करून आम्ही आपल्या देशातील सर्वात आवडत्या खेळाला म्हणजेच क्रिकेटसोबत मोठा स्क्रीन अनुभव आणि गरजणाऱ्या आवाजाचा रोमांच एकत्र आणत आहोत. विश्वचषकाचा उत्साह आणि भावना यामध्ये भर पाडतील. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी एक आभासी मेजवानी मिळेल.” विशेष म्हणजे, आयनॉक्स १६५ मल्टीप्लेक्स ७०५ स्क्रीनसोबत ७४ शहरांमध्ये काम करते. तसेच, संपूर्ण भारतात याची एकूण बैठक क्षमता १.५७ लाख इतकी आहे.

हेही वाचा :  Video: शुबमन गिल व सारा अली खानचा हॉटेलमधील ‘तो’ क्षण होतोय तुफान Viral, कॅमेरा बघताच दोघांनी… 

आयसीसी पुरुषांच्या टी२० विश्वचषकाच्या आठव्या आवृत्तीला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या फेरीनंतर २२ ऑक्टोबरपासून सुपर-१२ सामने सुरू होतील. अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल.