Afganistan vs Bangladesh Highlights: अफगाणिस्तानने बांगलादेशवर शानदार विजय मिळवत सेमीफायनलमधये धडक मारली आहे. या विजयासह अफगाणिस्तानने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अफगाणिस्तान बांगलादेश सामन्यात पावसाने सातत्याने व्यत्यय आणला. पावसामुळे वेळोवेळी समीकरण, लक्ष्य बदलताना दिसत होतं. अफगाणिस्तान या सामन्यात एक पाऊल पुढे होतं पण तरीही बांगलादेशने शेवटपर्यंत हार मानली नाही. या सामन्यात अचानक स्लिपमध्ये तैनात असलेला गुलबदीन पाय धरत खाली झोपला. त्याचा हा प्रकार पाहून कॉमेंटेटरपासून सर्वच जण हसू लागले. पण नेमकं काय घडलं पाहूया.
बांगलादेशला या सामन्यात सेमीफायनल गाठण्याची मोठी संधी होती. अफगाणिस्तानच्या फलंदाजांवर आळा घातल्याने अफगाणी फलंदाज प्रथम फलंदाजी करताना अवघ्या ११४ धावाच करू शकले. त्यामुळे या छोट्या धावसंख्येचा बचाव करण्याचं मोठ आव्हान त्यांच्यासमोर होतं. तर बांगलादेशला १२.१ षटकांत ११५ धावा करत सेमीफायनलमध्ये धडकण्याची मोठी संधी होती. पण अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर हे सोपं नव्हतं त्यात पाऊस व्यत्यय आणत होता. अफगाणिस्तानचे कोच बाहेरून संघाला सातत्याने मार्गदर्शन करत होते.
सामन्यातील १२ वे षटक सुरू होते. या षटकात पाऊस पुन्हा येण्याची चिन्हे होती आणि पावसाने हजेरी लावलीच. या षटकात डगआऊटमधून संघाचे कोच जोनाथन ट्रॉट यांनी इशार केला की पाऊस येतोय सावकाश खेळा,हळूहळू खेळा आणि हातवारे करत होते. हे पाहताच स्पिपमध्ये नीट उभा असलेला गुलबदीन नायब अचानक मैदानात झोपला, त्याच्या पायात क्रॅम्प आल्याचे त्याने सांगितले. गुलबदीनने कोचचा इशारा पाहिला होता आणि वेळ काढण्यासाठी त्याने ही युक्ती वापरली. रशीदला कळलं नाही अचानक घडलं काय, त्याने गुलबदीनला अचानक कोसळलेलं पाहताच तो वैतागला आणि काय झालं विचारत बडबडताना दिसला. तितक्यात मैदानावर कव्हर्स आणले आणि सामना थांबवण्यात आला. सामना जेव्हा थांबवला त्यावेळेस डीएलएसनुसार अफगाणिस्तान सामन्यात दोन धावांनी पुढे होतं.
This has got to be the most funniest thing ever ? Gulbadin Naib just breaks down after coach tells him to slow things down ?? pic.twitter.com/JdHm6MfwUp
— Sports Production (@SportsProd37) June 25, 2024
जेव्हा पाऊस आला तेव्हा बांगलादेशची धावसंख्या ७ बाद ८१ धावा होती आणि पावसामुळे सामना पूर्ण झाला नसता तर DLS पद्धतीनुसार अफगाणिस्तानने सामना जिंकून थेट उपांत्य फेरी गाठली असती. एवढेच नाही तर पाऊस थांबल्यानंतर सामना सुरू होताच गुलबदिन पुन्हा मैदानात आला. गुलबदीनच्या या नाटक केलेल्या दुखापतीच्या अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचसोबत नंतर गुलबदीनने दोन षटके टाकत महत्त्वाचा आठवा विकेटही त्याने मिळवून दिला. १२व्या षटकातील पाऊस थांबल्यानंतर एक षटक कमी करून सामना १९ षटकांचा करण्यात आला आणि ११४ धावांचे लक्ष्य देण्यात आले.