रेफ्युजी कॅम्पमध्ये क्रिकेटची धुळाक्षरं गिरवून कारकीर्द घडवणाऱ्या अफगाणिस्तानच्या शिलेदारांचा प्रवास ‘आऊट ऑफ द अॅशेस’ नावाच्या माहितीपटात उलगडण्यात आला होता. प्रतिकूल अशा सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या परिस्थितीतून या खेळाडूंनी शोधलेली वाट हा माहितीपटाचा केंद्रबिंदू होता. माहितीपटात एका प्रसंगात काबूलमधल्या जिममध्ये अफगाणिस्तानचा एक क्रिकेटपटू घाम गाळताना दिसतो. अतिशय प्राथमिक स्वरुपाची जिम असते. मागे अरनॉल्ड श्वार्झनेगरचं पोस्टर दिसतं. व्यायाम करुन झाल्यावर तो खेळाडू बलदंड बाहू अर्थात बायसेप्स दाखवतो आणि हसतो. त्या तरुणाचं नाव असतं गुलबदीन नईब. टी२० वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला चीतपट केलं. या विजयाचा शिल्पकार गुलबदीन. ४ विकेट्स, एक कठीण झेलसह गुलबदीनने शक्ती आणि युक्तीचा अनोख मिलाफ साधला.

गुलबदीनची पहिली आवड बॉडीबिल्डिंग हीच आहे. त्याची शरीरयष्टी पाहिल्यावर याचा लगेच अंदाज येतो. फलंदाजी करु शकणारा गोलंदाज ही त्याची मैदानावरची ओळख. २०१९ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत गुलबदीन अफगाणिस्तानचा कर्णधार होता. पण त्या स्पर्धेत अफगाणिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही आणि त्याचं खापर गुलबदीनच्या नेतृत्वावर फुटलं. गुलबदीनला कर्णधारपदावरून डच्चू देण्यात आला. सर्वसाधारणपणे माजी कर्णधार हा संघाचा अविभाज्य भाग राहतो. पण गुलबदीन सातत्याने संघाच्या आतबाहेर असतो. गोलंदाजी असो, फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण- गुलबदीनचा सळसळता वावर अफगाणिस्तान संघाचं चैतन्य आहे. विकेट पटकावल्यानंतर बायसेप्स दाखवण्याचं त्याचं सेलीब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल होतं. ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघाला चीतपट करण्यात गुलबदीनचा अनुभव कामी आला. दोन वर्षांपूर्वी टी२० वर्ल्डकप स्पर्धेत अॅडलेड इथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना गुलबदीनने २३ चेंडूत ३९ धावांची वेगवान खेळी केली होती. त्या लढतीत अफगाणिस्तानचा निसटता पराभव झाला. पण या खेपेस गुलबदीनने कोणतीही कसर सोडली नाही आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nitin Gadkari on Road Accidents
Nitin Gadkari: ‘मी तेव्हा माझे तोंड लपवतो’, नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना व्यक्त केली खंत
Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

फलंदाजी करताना गुलबदीनला भोपळाही फोडता आला नाही पण त्याचं उट्टं त्याने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भरुन काढलं. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची फिरकी खेळताना भंबेरी उडते. हे लक्षात घेऊन अफगाणिस्तान रशीद खान, मोहम्मद नबी, नूर अहमद केंद्रित आक्रमण करणार हे पक्कं होतं. त्याप्रमाणे झालंही. अफगाणिस्तानने नांगयालिया खरोटे नावाच्या नवख्या डावखुऱ्या फिरकीपटूलाही संघात घेतलं. या चौकडीचा सामना कसा करायचा यासाठी तयारी करणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी गुलबदीन आऊट ऑफ सिलॅबस प्रश्न ठरला.

गुलबदीनने काहीही अतरंगी अनोखं केलं नाही पण अतिशय शिस्तबद्ध लाईन अँड लेंथवर मारा करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणलं. मार्कस स्टॉइनस वर्ल्डकपमध्ये जोरदार फॉर्ममध्ये आहे. गुलबदीनने उसळता चेंडू टाकून स्टॉइनसला मोहात टाकलं. गुरबाझने गोंधळ न घालता चांगला झेल टिपला. टीम डेव्हिडकडे पदलालित्य नाही याचा अंदाज गुलबदीनला होता. बॅक ऑफ लेंथ चेंडू टाकून गुलबदीनने डेव्हिडला पायचीत केलं. यानंतरची विकेट गुलबदीनच्या आयुष्यातली सगळ्यात संस्मरणीय विकेट राहील. ग्लेन मॅक्सवेल आणि अफगाणिस्तान हे समीकरण क्रिकेटचाहत्यांनी अनुभवलं आहे. ऑफस्टंप बाहेर चेंडू टाकून गुलबदीनने मॅक्सवेलला उकसवलं. मॅक्सवेलने चेंडू स्लाईस केला पण तो हवेत उडाला. नूर अहमदने शानदार झेल टिपत मॅक्सवेलला माघारी धाडलं. या विकेटनंतरच गुलबदीनच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असा होता. ऑस्ट्रेलियाचा संघ कुठूनही पुनरागमन करतो हे जाणून असलेल्या गुलबदीनने पॅट कमिन्सला त्रिफळाचीत करत कांगारुंच्या आशा धुळीस मिळवल्या. वेग काढून घेतलेल्या चेंडूने ऑफस्टंपचा वेध घेतला. गुलबदीनने डावीकडे झेपावत अवघड झेल टिपला आणि अॅश्टन अगरही तंबूत परतला. ४ विकेट्स आणि एक झेल अशा सर्वसमावेशक कामगिरीसाठी गुलबदीनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

हा पुरस्कार स्वीकारताना गुलबदीन म्हणाला, ‘आम्ही या क्षणाची खूप काळ प्रतीक्षा केली. माझ्यासाठी, अफगाणिस्तान क्रिकेट आणि चाहत्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. या स्पर्धेसाठी आम्ही दोन महिने तयारी करत होतो. ही खेळपट्टी फलंदाजीला कठीण आहे हे लक्षात आलं. हा सांघिक विजय आहे. आम्ही अखेर ऑस्ट्रेलियाला हरवलं. गेल्या दशकभरात आम्ही अनेक संस्मरणीय विजय मिळवले. या स्पर्धेत आम्ही न्यूझीलंडला हरवलं, आज ऑस्ट्रेलियाला चीतपट केलं. ऑस्ट्रेलिया बलाढ्य संघ आहे. आमचा प्रवास आता सुरू झाला आहे’.

७७ वनडे, ५७ टी२० सामन्यात गुलबदीनने अफगाणिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. अफगाणिस्तानचा संघाचा उल्लेख आला की रशीद खान, मोहम्मद नबी हे चेहरे प्रामुख्याने डोळ्यासमोर तरळतात. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाने गुलबदीन नईबचं नाव जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहोचलं. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत गुलबदीन नईब दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला होता. ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श दुखापतग्रस्त झाल्यानेच गुलबदीनला बदली खेळाडू म्हणून संघात घेण्यात आलं. योगायोग म्हणजे मिचेल मार्शच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला हरवण्यात गुलबदीन किमयागार ठरला.

Story img Loader