Harbhajan Singh Shared Post for Pakistan Coach Gary Kirsten: पाकिस्तान संघाच्या टी-२० विश्वचषकातील सुमार कामगिरीसाठी त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. चाहते, क्रिकेट तज्ञ, पाकिस्तानचे माजी खेळाडू या सर्वांकडूनच पाकिस्तान क्रिकेट टीमवर ताशेरे ओढत आहेत. यानंतर पाकिस्तानी संघाचे नवे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी संघाबद्दल मोठे खुलासे करत त्यांचे जगासमोर वाभाडे काढले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगने कर्स्टन यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे, त्याचं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय आहे.

हेही वाचा – Super 8 Explainer: वर्ल्डकपमधील सुपर८चे सामने कसे खेळवले जाणार? काय आहे A1, B2 चं गणित; जाणून घ्या सविस्तर

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने गॅरी कर्स्टनला पाकिस्तानात आपला वेळ वाया घालवू नका असा सल्ला दिला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या माजी क्रिकेटपटूने सांगितले की बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघात एकता नाही. आयपीएल २०२४ मध्येच कर्स्टन पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक बनले होते. पाकिस्तानचा संघ पहिल्याच फेरीत पराभूत होऊन २०२४ च्या टी२० विश्वचषकातून बाहेर पडला.

‘पाकिस्तानमध्ये वेळ वाया घालवू नका’ हरभजन सिंगचा कर्स्टनला सल्ला

गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तानी खेळाडूंनी त्यांच्या निराशाजनक टी-२० विश्वचषक मोहिमेदरम्यान एकमेकांना पाठिंबा न दिल्याबद्दल टीका केली आहे आणि असे म्हटले आहे की मी अनेक संघांसोबत काम केलं आहे पण कोणत्याच संघात असं वातावरण पाहिलं नाही. कर्स्टन यांनी टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता परंतु पहिल्या फेरीत अमेरिका आणि भारत यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्याने ते निराश झाले होते.

हेही वाचा – T20 WC 2024 : गॅरी कर्स्टनने पाकिस्तान संघाची काढली लाज; म्हणाले, ‘कधी कोणता शॉट खेळायचा कोणालाच कळत नाही…’

गॅरी कर्स्टन यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. हरभजन सिंगने ‘X’ वर पोस्ट करत लिहिले, ‘तिथे तुमचा वेळ वाया घालवू नका गॅरी.. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावर परत या. गॅरी कर्स्टन दुर्मिळ व्यक्तींपैकी एक आहे. भारताच्या २०११ साठीच्या वर्ल्डकप संघातील एक उत्तम प्रशिक्षक, मार्गदर्शक, प्रामाणिक आणि अतिशय प्रिय मित्र. आमचे २०११ चे विश्वचषक विजेते प्रशिक्षक. स्पेशल आहेस तू गॅरी.’

हेही वाचा – ‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक पदी लवकरच नव्या कोचची वर्णी लागणार आहे. भारताचे सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ येत्या वर्ल्डकपनंतर संपणार आहे. त्याचसोबत भारताच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. पण त्यासाठी अर्ज करणारा गौतम गंभीर हा एकमेव अर्जदार आहे आणि आता यानंतर गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदासाठीची मुलाखत आज म्हणजेच मंगळवारी होणार आहे. २०११ चा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा गंभीर देखील एक भाग होता.

Story img Loader