India Vs South Africa T-20 World Cup Final : टी २० वर्ल्डकपचा महिनाभरापासून सुरु असलेला थरार अखेर भारताच्या विजयाने संपला आहे. आता विजयानंतर सध्या सर्व स्तरांवर भारतीय टीमचं कौतुक करण्यात येत आहे.विश्वचषकाच्या या फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयाचे अनेक स्टार्स होते आणि त्यात एक नाव सर्वात खास होतं ते म्हणजे हार्दिक पांड्या. हार्दिक पाड्यांने अखेरच्या षटकात टीम इंडियाला विजय मिळवून दिला आणि तोच या सामन्याचा हिरो ठरला. फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केल्यानंतर अष्टपैलू हार्दिक पांड्याला अश्रू अनावर झाले.
दरम्यान यानंतर अनेक खेळाडूंनी आपल्या कुटुंबीयांना तसेच पत्नीला आनंदाने मिठी मारली. विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मला व्हिडीओ कॉल करत आपला आनंद साजरा केला. तर रोहित शर्मानेही पत्नी रितिकाला मिठी मारत आनंद व्यक्त केला. याच उत्साहादरम्यान, सध्या हार्दिक पांड्याचा एक फोटो सगळीकडे व्हायरल होत आहे. या फोटोला पाहून हार्दिक पांड्याला त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकचा व्हिडीओ कॉल आला, असा नेटकरी तसेच पांड्याचे चाहते दावा करत आहेत.
हार्दिक पांड्याला पत्नी नताशाचा व्हिडीओ कॉल?
या ऐतिहासिक विजयानंतर हार्दिक पांड्याचा हा फोटो लक्ष वेधून घेत आहे. हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी अभिनेत्री नताशा स्टेनकोविक या दोघांच्या वैवाहिक आयुष्याची सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून उलट-सुलट चर्चा ऐकायला मिळत आहे. हार्दिक-नताशा या दोघांमध्ये बिनसलं असून लवकरच ही जोडी घटस्फोट घेणार असल्याचीही चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या प्रकरणाबाबत दररोज नवनवीन समोर येत असून विशेष म्हणजे यावेळच्या आयपीएल पर्वात हार्दिक पांड्या मैदानात असताना एकाही सामन्यात नताशा स्टेडियममध्ये दिसली नाही. त्यामुळे नेटकरी वेगवेगळे अंदाज बांधत आहेत.
विजयानंतर मैदानात नेमकं काय घडलं?
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, विराट कोहलीनंतर हार्दिक पंड्यालाही एक व्हिडीओ कॉल आला. या व्हिडीओ कॉलमध्ये तो कोणाशीतरी बोलत असल्याचे दिसतेय. खाली मैदानावर बसून तो मोबाईलमध्ये बघून बोलत आहे. या व्हिडीओ कॉलचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच फोटोंचा आधार घेत नताशा आणि पांड्या यांच्यात व्हिडीओ कॉल चालू होता, असा दावा केला जातोय. खरं म्हणजे हार्दिक नेमकं कोणाशी बोलत होता, हो कळलेलं नाही करण फोटोमध्ये तसं कोण आहे हे दिसत नाहीये. मात्र चाहते नताशाचाच व्हिडीओ कॉल असल्याचा दावा करत समाधान व्यक्त करत आहेत.
पाहा हार्दिक पांड्याची पोस्ट
हेही वाचा >> “हे स्वप्न नाहीये तर…” विश्वचषक विजयानंतर हार्दिक पांड्याची भारतीयांसाठी खास पोस्ट; चाहत्यांनो एकदा पाहाच
फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केल्यानंतर अष्टपैलू हार्दिक पांड्याला अश्रू अनावर झाले. दरम्यान यानंतर हार्दिक पांड्याने या ऐतिहासिक विजयानंतर आज एक सर्व भारतीयांसाठी खास पोस्ट केली आहे. हार्दिक पांड्यानं त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्याखाली एक कॅप्शन लिहलं आहे. यावेळी तो म्हणतो. “गुड मॉर्निंग इंडिया, हे स्वप्न नाहीये तर खरं आहे आपण विश्वविजेते आहोत” असं हार्दिक पांड्याने या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd