Hardik Pandya Creates History: भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० संघाचा उप-कर्णधार हार्दिक पंड्याने इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत पंड्याने शानदार कामगिरी केली. त्याने गोलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी करत हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांच्या महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या, जे सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरले. हार्दिक पंड्याच्या या शानदार कामगिरीचा त्याला आयसीसच्या क्रमवारीत फायदा झाला आहे. आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२४ नंतर आता टी-२० मधील नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत फायनलमध्ये अखेरच्या षटकात शानदार कामगिरी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या हार्दिक पंड्याने मोठी झेप घेतली आहे.

हार्दिक पंड्या आता टी-२० फॉरमॅटमधील जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. हार्दिकने सर्वच उत्कृष्ट खेळाडूंना मागे टाकत नंबर वन अष्टपैलू खेळाडू ठरला. हार्दिकचे रेटिंग गुण २२२ आहेत. हार्दिक पंड्या आणि श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा यांचे रेटिंग समान असले तरी, हार्दिकला आयसीसीने पहिल्या क्रमांकावर ठेवले आहे.

Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Rohit Sharma Invites Indian Fans to celebrate T20 World Cup win
Rohit Sharma: “उद्या संध्याकाळी मरीन ड्राईव्हला…”, रोहित शर्माकडून क्रिकेटरसिकांना वर्ल्डकप विजयाच्या सेलिब्रेशनचं निमंत्रण
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
India T20 World Cup Win Parade
पंतप्रधानांची भेट अन् खुल्या बसमधून विजयी परेड… गुरूवारी मायदेशात दाखल झाल्यानंतर कसं असणार टीम इंडियाचं वेळापत्रक?
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Rishabh Pant Medical Time Out Delayed The Game with Perfect Move
T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण
Shaun Pollock Statement on Suryakumar Yadav Catch
VIDEO: दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूचं सूर्याच्या कॅचवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “बाऊंड्री कुशन हललं, पण…”
Suryakumar Yadav Statement on Rohit sharma about Catch
“तो कधी सीमारेषेजवळ नसतो पण…”, सूर्यकुमारचा फायनलमधील कॅचबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, “रोहितकडे चेंडू फेकणार होतो”

हेही वाचा – मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

हार्दिक पंड्या आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये अष्टपैलूंच्या क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवणारा पहिला भारतीय ठरला आहे. पंड्याने संपूर्ण स्पर्धेत बॅट आणि बॉलने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने १५० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने १४४ धावा केल्या आणि ११ विकेट घेतले.

ICC ने नुकत्याच जाहीर केलेल्या टी-२० मधील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हार्दिक पांड्या २२२ च्या रेटिंगसह अव्वल स्थानी आला आहे. त्याने दोन स्थानांनी झेप घेतली. हार्दिक पांड्याने टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि त्यानंतरच्या फायनलमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. सामन्याचे शेवटचे षटक टाकत असताना भारतीय संघाला चॅम्पियन बनवण्यातही त्याचे मोठे आणि महत्त्वाचे योगदान होते.

हेही वाचा – “तो कधी सीमारेषेजवळ नसतो पण…”, सूर्यकुमारचा फायनलमधील कॅचबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, “रोहितकडे चेंडू फेकणार होतो”

हार्दिक आणि हसरंगानंतर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टायनिस आहे. त्यानेही एका स्थानाने झेप घेतली आहे. तो आता या यादीत २११ रेटिंगसह तिसऱ्या स्थानी आहे. झिम्बाब्वेच्या सिकंदर रझालाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो २१० रेटिंगसह चौथ्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू बनला आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन २०६ रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला. यादरम्यान अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीला मात्र फटका बसला आहे.

हेही वाचा – T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण

अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी २०५ रेटिंगसह चार स्थानांनी घसरून सहाव्या स्थानावर आला आहे. नेपाळचा दीपेंद्र सिंग १९९ रेटिंगसह सातव्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टनने एका स्थानाची प्रगती केली. तो आता १८७ रेटिंगसह आठव्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन माक्ररम १८६ रेटिंगसह ९व्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा मोईन अली आता नवव्या स्थानावरून दहाव्या स्थानावर घसरला आहे. त्याचे रेटिंग १७४ आहे.