Hardik Pandya’s old pain came out in front of PM Modi : २९ जून रोजी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून टी-२० विश्वचषक जिंकला. १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकातील विजयाची प्रतिध्वनी बार्बाडोसपासून भारतापर्यंत ऐकू आली. टीम इंडिया घरी परतली तेव्हा लोक रस्त्यावर उतरले होते. पंतप्रधान मोदींनीही संपूर्ण टीमला पंतप्रधान निवासस्थानी बोलावून ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यादरम्यान त्यांनी फायनलमधील शेवटच्या ओव्हरचा बादशाह हार्दिक पंड्यासह सर्व खेळाडूंशी चर्चा केली. पीएम मोदींसमोर हार्दिक भावूक दिसला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आयपीएलदरम्यान हार्दिक पंड्याची झोप उडाली होती –

एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर आयपीएल २०२४ चा मिनी लिलाव झाला. यावेळी मुंबई इंडियन्सने आपल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. फ्रँचायझीने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून संघाची कमान हार्दिक पंड्याकडे सोपवली होती. त्यानंतर ३-४ महिने हार्दिकला सतत ट्रोल करण्यात आले, मग तो मैदानात असो वा सोशल मीडियावर. अनेक दिग्गजांनी हार्दिकला पाठिंबा दिला होता, तरी चाहते मात्र हार्दिकची खिल्ली उडवताना दिसले. हार्दिकने पंतप्रधान मोदींसमोरच या मुद्द्यावर मौन सोडले आहे.

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
manoj jarange patil health update
“मी थोड्याच दिवसांचा पाहुणा, हे शरीर कधी जाईल…”, मनोज जरांगे पाटलांचं भावनिक विधान!
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
Raosaheb Danave Beating Karyakarta
Raosaheb Danave Viral Video : फोटो फ्रेममध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी लाथाडलं; VIDEO व्हायरल!
maharashtra election 2024 yogi adityanath fact check viral video
भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ बुलडोझर घेऊन उतरले मैदानात! लोकांना हात जोडून केलं मतदानाचं आवाहन? Video खरा पण…

काय म्हणाला हार्दिक पंड्या?

जेव्हा पीएम मोदी हार्दिककडे वळले तेव्हा स्टार ऑलराऊंडर म्हणाला, ‘गेले ६ महिने माझ्यासाठी खूप मनोरंजक होते. या कालावधीत माझ्या आयुष्यात खूप चढ-उतार आले. यावेळी लोकांनी मला प्रचंड ट्रोल केले. अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. ज्यामुळे मला नेहमी वाटायचं की मला उत्तर द्यायचं असेल, तर ते आपल्या खेळातूनच द्यायला हवं. त्यामुळे मी खंबीरपणे या सर्व गोष्टींचा सामना केला आणि कठोर परिश्रम घेण्याचे ठरवले. त्यानुसार मी खूप मेहनत घेतली आणि त्यामुळे शेवटचे षटक टाकण्याची संधी मिळाली. ज्याने माझे संपूर्ण आयुष्य उजळले.”

हेही वाचा – Virat Kohli : टीम इंडियाच्या व्हिक्टरी परेडनंतर विराटने आपल्या ‘द्रोणाचार्यां’ची घेतली गळाभेट, फोटो होतोय व्हायरल

पीएम मोदींनी काय विचारलं?

हार्दिकची व्यथा ऐकून घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्याला एक मजेशीर प्रश्न विचारला. मोदींनी म्हणाले, ‘तुझी ओव्हर ऐतिहासिक ठरली, पण तू सूर्याला काय म्हणालास?’ या प्रश्नाच्या उत्तरात हार्दिक म्हणाला, ‘हा झेल घेताच आम्ही सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. यानंतर सूर्याबरोबर चर्चा केली, ज्यामध्ये त्याने झेल व्यवस्थित पूर्ण केला आहे की नाही याची खात्री करुन घेतली. त्यावर सूर्या म्हणाला त्याने झेल व्यवस्थित पूर्ण केला आहे. त्यामुळे आम्ही रिलॅक्स झालो.’

हेही वाचा – ‘आमच्या लोकसंख्येपेक्षा अधिक लोक तर टीम इंडियाच्या पार्टीला…’, व्हिक्टरी परेडवर क्रिकेट आइसलँडचे मजेशीर ट्वीट

हार्दिकने मुंबईसह भारतीय चाहत्यांचे मानले आभार –

हार्दिक पंड्याने पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर झालेल्या सत्कार समारंभानंतर आपल्या भावना एक्सच्या माध्यमातून व्यक्त केल्या. हार्दिकने लिहिले, ‘भारत हे माझं विश्व आहे. प्रचंड प्रेम आणि जिव्हाळ्यासाठी अतिशय मनापासून आभारी आहे. हे संस्मरणीय क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही. पाऊस असूनही हजारोंच्या संख्येने तुम्ही आम्हाला भेटायला आलात, तुमचे मनापासून आभार. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमच्याबरोबर विजयाचा आनंद साजरा करता येणं आमच्यासाठी खास क्षण आहे. आपण सगळे विश्वविजेते आहोत. १४२ कोटी आपण विजेते आहोत. मुंबई, थँक्यू, भारत-थँक्यू यू.