Jay shah statement India New T20I Captain: रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्त करणार का यावर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी उत्तर दिले आहे. शनिवारी रोहितने भारतासाठी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. रोहित दुखापतीमुळे किंवा विश्रांतीच्या कारणासाठी नसायचा तेव्हा हार्दिक कर्णधारपद सांभाळायचा. त्यामुळे आता रोहितच्या जागी हार्दिकच भारताचा पूर्णवेळ कर्णधार होणार का यावर जय शाह काय म्हणाले, जाणून घ्या.

हेही वाचा – T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण

Rishabh Pant Medical Time Out Delayed The Game with Perfect Move
T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Jasprit Bumrah Viral Funny Video Post IND vs ENG
“बुमराह तू ये, माझा हात..”, IND vs ENG मॅच जिंकताच अंपायरच्या भेटीला गेला जसप्रीत पण.. Video पाहून चाहते लोटपोट
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
Jasprit Bumrah Speaks To ICC Before IND vs SA Finals
बुमराह रोहित शर्माच्या कर्णधारपदावर उघडपणे बोलला; IND vs SA मॅचसाठी कमी वेळ मिळण्यावरून म्हणाला, “साध्या गोष्टी पण..”
Suryakumar Yadav Statement on David Miller Stunning Catch
IND vs SA: “…तेव्हा वाटलं ट्रॉफीचं बाऊंड्रीच्या पलीकडे जातेय”, सूर्याने सांगितली मिलरच्या मॅचविनिंग कॅचमागची गोष्ट; म्हणाला, “आता सगळं…”
Kapil Dev Remark On Virat Kohli & Rohit Sharma
“विराट कोहली १५० किलोचे डंबेल उचलतो, पण रोहित शर्माचा एक पॅक..”, कपिल देव यांचं मोठं विधान; म्हणाले, “मर्यादांची..”
Team India
जगज्जेत्या टीम इंडियावर पैशांचा पाऊस, ICC पाठोपाठ BCCI कडून ‘इतक्या’ कोटींचं बक्षीस

टी-२० मधून निवृत्ती घेतल्यामुळे रोहित आता भारताच्या आगामी कोणत्याच टी-२० मालिकांसाठी संघाचा सेटअपचा भाग नसेल. त्यामुळे आता BCCI ने टी-२० मध्ये त्यांचा नवीन पूर्णवेळ कर्णधार कोण असणार यावर विचारप्रक्रिया सुरू केली आहे. हार्दिकचा विचार करता त्याने १६ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे आणि त्यापैकी १० मध्ये त्यांना विजय मिळवून दिला आहे. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ३ वेळा कर्णधारपद भूषवले आहे.

हार्दिक पंड्या टी-२० फॉरमॅटमध्ये रोहितचा उत्तराधिकारी असेल अशी चर्चा सुरू असताना, जय शाह म्हणाले की निवडकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर रोहितच्या बदलीची घोषणा केली जाईल. जय शाह म्हणाले, “कर्णधारपदाचा निर्णय निवडकर्ते घेतील आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा करून त्याची घोषणा करू. तुम्ही हार्दिकबद्दल प्रश्न विचारला तर त्याच्या फॉर्मवर बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते पण आम्ही आणि निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याने स्वतःला सिद्ध केले आहे,” जय शाह म्हणाला.

हेही वाचा – “…तेव्हा वाटलं ट्रॉफीचं बाऊंड्रीच्या पलीकडे जातेय”, सूर्याने सांगितली मिलरच्या मॅचविनिंग कॅचमागची गोष्ट; म्हणाला, “आता सगळं…”

नवा कर्णधार
टी-२० मध्ये भारतासाठी गेल्या काही काळात अनेक खेळाडूंनी कर्णधार म्हणून कामगिरी केली आहे. हार्दिक पंड्या त्यानंतर जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि आता शुबमन गिलकडे भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे भारताचा टी-२० मधील पुढील कर्णधार कोण असणार यावर चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – “…खूप अवघड असेल”, रोहितच्या टी-२० मधील निवृत्तीनंतर पत्नी रितिकाची भावुक पोस्ट, म्हणाली; “गेले काही महिने…”

टी-२० विश्वचषकानंतर ६ जुलैपासून भारत वि झिम्बाब्वेमध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. नुकताच टी-२० विश्वचषक झाल्यामुळे वर्ल्डकपमधील बऱ्याच खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर शुबमन गिलकडे झिम्बाब्वे मालिकेसाठीच्या भारतीय संघाचे नेतृत्त्व सोपवले आहे. झिम्बाब्वे दौऱ्यानंतर, भारत या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेचा दौरा करेल, जिथे ते ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहेत. मात्र, या मालिकेचा कर्णधार अद्याप निश्चित झालेला नाही.