Haris Rauf Breaks into ugly fight on Road with fan Video Viral: टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानी खेळाडूंवर जोरदार टीका होत आहे. नवे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनीही संघातील खेळाडूंवर ताशेरे ओढले. कर्स्टन यांनी सांगितले की खेळाडू एकमेकांना साथ देत नाहीत आणि असं वातावरण त्यांनी आजवर कोणत्याच संघात पाहिलं नाही. वेगवान गोलंदाज हारिस रौफही टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. यंदाच्या विश्वचषकात धावा रोखण्यात तो अपयशी ठरला असून त्याला फार चांगली कामगिरी करता आली नाही. याच दरम्यान एक चाहता हारिससोबत बोलत असताना संघाच्या कामगिरीवर तो बोलू लागला आणि पत्नीसोबत जात असलेला हारिस भडकला आणि त्याच्या अंगावर धावून गेला. ज्याचा व्हीडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Super 8 Explainer: वर्ल्डकपमधील सुपर८चे सामने कसे खेळवले जाणार? काय आहे A1, B2 चं गणित; जाणून घ्या सविस्तर

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

व्हायरल व्हीडिओमध्ये हारिस खूप संतापलेला दिसत आहे. तो अमेरिकेत एका चाहत्याला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला. यामध्ये त्याची पत्नी मुझना मसूद मलिकही त्याच्यासोबत दिसत आहे. हारिस इतका संतापला की त्याने पत्नीला ढकलून दिलं आणि चाहत्याला मारण्याचा प्रयत्न केला. कसंबसं इतरांनी त्याला अडवले. हरिसला टी-२० विश्वचषकातील ४ सामन्यांत फक्त ६ विकेट घेता आल्या. यादरम्यान त्याने गोलंदाजी करताना एकूण १०१ धावा दिल्या.

हेही वाचा – T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंग? ‘या’ संघातील खेळाडूला वेगवेगळ्या नंबरवरून आले कॉल, ICC ला कळताच…

पाकिस्तानी खेळाडू हारिस रौफचा भांडणाचा व्हीडीओ व्हायरल

व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की बाबर आझमच्या टीमचा प्रमुख खेळाडू हारिस रौफ हा हॉटेलजवळ पत्नीसोबत फिरताना दिसला आणि बाजूने जाणारे चाहते त्याला काहीतरी म्हणाले. यावर तो इतका संतापला की बाजूला लावलेली झाडे ओलांडून तो पायातील चप्पल काढून टाकत चाहत्याच्या अंगावर धावून गेला. चाहते त्याला नेमकं त्याला काय म्हणाले याचा अंदाज लागला नाही. पण हारिस त्याला म्हणाला, काय रे बापाला शिवीगाळ करतोस का?

हेही वाचा – ‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”

हे सारं पाहून आणखी काही लोकही होते, जे त्याला चाहत्याच्या जवळ जाण्यापासून वाचवतात यावर तो म्हणतो – हा नक्कीच भारतीय असेल…तर यावर चाहताही मागे हटताना दिसत नाहीत. तो पुढे सरकतो आणि छाती उंचावत म्हणतो – मी पाकिस्तानी आहे. यावर हारिस म्हणतो, तुझ्या वडिलांनी तुला हेच शिकवलं का? हारिसचा हा भडकलेला अवतार पाहून व्हीडिओवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. याआधी आझम खानही चाहत्यासोबत भांडताना दिसला होता. चाहत्याने आपल्यासोबत गैरवर्तन करत असल्याचा आरोप त्याने केला.

Story img Loader