How can India play Pakistan again in T20 World Cup 2022: रविवारी (२३ ऑक्टोबर रोजी) मेलबर्नच्या क्रिकेट मैदानात झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा भारताने चार गडी राखून अगदी शेवटच्या चेंडूवर पराभव केला. हा सामना इतका रंजक आणि रोमहर्षक झाला की आता चाहते इंटरनेटवर पुन्हा या टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये हे दोन्ही संघ आमने-सामने पहायला मिळतील का यासंदर्भातील माहिती शोधत असल्याचं चित्र दिसत आहे.

नक्की वाचा >> T20 World Cup: “विराटने टी-२० मधून निवृत्त व्हावं कारण…”; भारताच्या विजयाचं विश्लेषण करताना शोएब अख्तरचं विधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खरोखर असं झालं तर आर्थिक गणितं पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती म्हणजेच आयसीसीला फार आनंद होईल यात शंकाच नाही. मात्र खरोखर भारत आणि पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत पुन्हा आमने-सामने येऊ शकतात का? तर या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे नाही असं देता येणार नाही. भारत-पाकिस्तान टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२२ मध्ये आमने-सामने येणार का? या प्रश्नाचं उत्तर ‘हो असं होऊ शकतं’ असं देता येईल. पण थांबा जास्त उतावळे होऊ नका.

नक्की वाचा >> World Cup: “डकवर्थ लुईसनुसार आयर्लंडला विजयी घोषित करणं खेळ भावनेला धरुन नाही असं…”; इंग्लंडच्या पराभवानंतर त्या पोस्टची चर्चा

स्पर्धा कशी खेळवली जात आहे?
यंदा आयसीसीने पुरुषांची टी-२० विश्वचषक स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये विभागली आहे. पहिल्या फेरीमध्ये प्रत्येकी चार संघ याप्रमाणे दोन गटांमध्ये सामने राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवले गेले. प्रत्येक गटातील दोन संघ अव्वल १२ फेरीसाठी पात्र ठरले. आता हे संघ ग्रुपमध्ये प्रत्येकी सहा या प्रमाणे दोन गटांमध्ये सामने खेळत आहे. भारत दुसऱ्या गटात असून या गटामध्ये भारताबरोबर दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश, झिम्बाब्वे, नेदरलॅण्ड हे संघ आहेत. तर पहिल्या गटामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान हे सहा संघ आहेत. आता या संघांमध्ये जे दोन संघ जिंकतील ते पुढील फेरीसाठी पात्र ठरतील. म्हणजेच सुपर फोर अर्थात उपांत्य फेरीत हे संघ दाखल होती. त्यानंतर हे चारही संघ परस्परविरोधी गटातील अव्वल संघाविरुद्ध उपांत्यफेरीचा सामना खेळतील. ही फेरी बादफेरी पद्धतीने खेळवली जाईल. त्यानंतर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना होईल.

नक्की वाचा >> Ind vs Pak: “…तर भारताला विश्वचषक जिंकणं शक्य नाही”; रोमहर्षक सामना भारताने जिंकल्यानंतर इंझमाम-उल-हकचं विधान

भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यातच शक्य
भारत-पाकिस्तान आमने-सामने येण्याची शक्यता पुन्हा असली तरी ती फारच धुसर आहे. अगदीच स्पष्टपणे सांगायचं झालं तर आता केवळ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्येच हे दोन्ही संघ एकमेकांच्याविरोधात उभे ठाकलेले दिसू शकतील. मात्र हा सर्वांनाच हवा हवासा सामना होण्यासाठी बऱ्याच जर-तरच्या गोष्टी जुळून येणं आवश्यक आहे. यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही संघाची कामगिरी.

नक्की वाचा >> Ind vs Pak: “…लाज वाटते का?” भारताच्या विजयानंतर गौतम गंभीर ठरतोय टीकेचा धनी; जाणून घ्या टीकेमागील ‘विराट कनेक्शन’

दोन्ही संघांना काय करावं लागेल?
भारत आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा या स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळायचं असेल तर सर्वात आधी त्यांनी सुपर १२ म्हणजेच अव्वल १२ गटातील फेऱ्यांमध्ये आपल्या ग्रुपमध्ये दोन्ही अव्वल स्थान पटकवावी लागतील. म्हणजेच बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतरच दोन्ही संघांना गट फेरीमध्ये अव्वल स्थानांवर हक्क सांगता येणार आहे. तसेच पुढील फेरीत म्हणजेच उपांत्यफेरीत या संघांना पहिल्या गटातील ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड किंवा श्रीलंकेसारख्या संघाविरोधात सामने खेळावे लागतील आणि ते जिंकावे लागतील. मात्र हे सारं घडलं तर भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना दोन्ही संघाचा पहिला सामना झाला त्याच मेलबर्नच्या क्रिकेट मैदानामध्ये १३ नोव्हेंबर रोजी भारत विरुद्द पाकिस्तान सामना पाहता येईल.

नक्की वाचा >> Ind vs Pak: शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी उड्डाण पाच मिनिटांनी लांबवलं? विमान मुंबई एअरपोर्टच्या रनवेवर धावत असतानाच…

भारताचे सामने कधी?
२७ ऑक्टोबर – नेदरलॅण्ड
३० ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका
२ नोव्हेंबर – बांगलादेश
६ नोव्हेंबर – झिम्बाब्वे

नक्की वाचा >> Ind vs Pak: चित्तथरारक विजय मिळवून दिल्यानंतर विराटचा अनुष्काला कॉल; म्हणाला, “तिने एकच गोष्ट सांगितली की, इथे लोक मला…”

पाकिस्तानचे सामने कधी?
२७ ऑक्टोबर – झिम्बाब्वे
३० ऑक्टोबर – नेदरलॅण्ड
३ नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिका
६ नोव्हेंबर – बांगलादेश