T20 World Cup Team India Next Match: यंदाच्या टी २० विश्वचषकातील जवळपास प्रत्येक सामन्यात वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळाले. जिंकता जिंकता सामना गमावणे ते हरलेल्या सामन्यातून खेचून विजय घेऊन येणे. खेळाडूंचे भन्नाट शॉट ते अशक्य वाटणाऱ्या विकेट्स, मोडलेले रेकॉर्ड्स आणि बरंच काही एकाच विश्वचषकात दिसून आलं. आतापर्यंतची विश्वचषकाचे खेळी पाहता आता सेमीफायनल व अंतिम सामन्यात काहीही घडू शकतं हे काही वेगळं सांगायला नको. टी २० वर्ल्ड कपचं सध्याचं पॉईंट टेबल पाहता येत्या सामन्यात जर काही समीकरणे जुळून आली तर पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तानचा थरार अनुभवता येईल अशी शक्यता आहे. भारत सध्या पॉईंट टेबलच्या टॉपला आहे तर पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेला हरवून आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडिया व पाकिस्तानचे आगामी सामने

टी २० विश्वचषकात भारत व पाकिस्तान दोन्ही संघांसाठी रविवार म्हणजेच ६ ऑक्टोबर हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. ६ तारखेला भारत विरुद्ध झिम्बाम्बावे सामना रंगणार असून पाकिस्तान यादिवशी बांग्लादेशच्या विरुद्ध लढणार आहे तर दक्षिण आफ्रिका नेदरलँडच्या विरुद्ध सामना खेळणार आहे. या सामन्यात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला हरवल्यास किंवा पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास पाकिस्तानच्या आशा पल्लवित होतील. या सामन्यात पाकिस्तानला बांग्लादेशला हरवणे गरजेचे आहे.

दुसरीकडे भारतासाठी टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित आहे. भारताच्या संघाने झिम्बाब्वेला पराभूत केल्यास ८ गुणांसह सेमीफायनलमध्ये पोहोचतील जर सामना पावसाने रद्द झाला तर ७ गुणांसह भारत उपांत्य फेरीत प्रवेश करेल.मात्र जर भारत झिम्बाम्बावेसमोर पराभूत झाला आणि दक्षिण आफ्रिका नेदरलँड समोर विजयी ठरली तर आफ्रिका सुद्धा ६ पॉइंट्ससह भारताच्या बरोबरीला येईल.

दरम्यान, आज न्यूझीलंडने आयर्लंडवर ३५ धावांनी विजय मिळवत टी२० विश्वचषक २०२२ मध्ये उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. सेमीफायनल 1 मध्ये भारताची लढत न्यूझीलंडशी होणार हे जवळपास निश्चित आहे. जर सर्व समीकरणे जुळून आली तर उपांत्य फेरीत पाकिस्तानची लढत इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाशी होऊ शकते. सेमीफायनलमध्ये दोन्ही संघांचा विजय झाल्यास भारत व पाकिस्तान १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये आमने सामने येतील.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How ind vs zim can lead to ind vs pak in t20 world cup finals date time latest t20wc point table update svs