Fervent fans rally behind Kohli with spirited chants video viral : विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. विराट कोहलीला भेटण्यासाठी अनेकवेळा चाहते मैदानात पोहोचले आहेत. याचे परिणामही त्यांना भोगावे लागले आहेत. अशा अनेक घटना पाहिल्या मिळाल्या आहेत. लाइव्ह मॅच सुरू असताना, स्टेडियममधील अनेक चाहते सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकमा देत विराट कोहलीजवळ पोहोचले. भारत आणि कॅनडा यांच्यातील सामन्यापूर्वी माजी कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चाहते विराट कोहलीच्या नावाने घोषणा देत आहेत.
शनिवारी फ्लोरिडामध्ये होणारा भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही आणि पंचांनी दोनदा मैदानाची पाहणी केल्यानंतर खराब आऊटफिल्डमुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. सामन्यापूर्वी फ्लोरिडामध्ये भरपूर पाऊस झाल्याने मैदान ओले झाले होते. मैदान कोरडे करण्याचा प्रयत्न मैदानधारकांनी केला, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अशा प्रकारे खराब आऊटफिल्डमुळे सामना रद्द करण्यात आला, ज्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आले.
‘हमारा नेता कैसा हो, कोहली जैसा हो…’
भारत आणि कॅनडा यांच्यातील सामन्यापूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये विराट कोहली सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे आणि स्टँडवर उपस्थित असलेले काही चाहते घोषणाबाजी करत आहेत. कोहोलीबाबत चाहत्यांकडून असाच नारा दिला जात होता की, ‘हमारा नेता कैसा हो, कोहली जैसा हो…’ हे ऐकल्यानंतर विराट कोहलीही हसायला लागतो आणि चाहत्यांकडे बघतो. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा – AUS vs SCO, T20 World Cup 2024 : स्कॉटलंडची ऑस्ट्रेलियाविरुद्धची झुंज अपयशी; इंग्लंडला उघडलं सुपर८चं दार
टीम इंडियाचे सुपर-८ फेरीचे वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार) :
२० जून २०२४: अफगाणिस्तान विरुद्ध भारत: केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस: रात्री ०८:०० वाजता
२२ जून २०२४: भारत विरुद्ध D2: सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिगा: रात्री ०८:०० वाजता
२४ जून २०२४: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत: डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया: रात्री ०८:०० वाजता