125 Crore Prize to Team India from BCCI : टी-२० विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी जिंकून भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी परतला. बार्बाडोसच्या मैदानावर अंतिम सामना जिंकल्यानंतर, तेथे आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया लगेच निघू शकली नाही. टीम इंडियाचे सर्व खेळाडू बार्बाडोसहून एअर इंडियाच्या विशेष विमानाने थेट दिल्लीला पोहोचल्यानंतर हॉटेलकडे रवाना झाले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी टीम सकाळी ११ वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचली. यानंतर टीम इंडिया मुंबईत पोहोचली. जिथे विजयी परेड पार पडली आणि शेवटी वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी बीसीसीआयने टीम इंडियाकडे १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
ही बक्षीस रक्कम संपूर्ण संघाला देण्यात आली असून त्यात संघातील खेळाडू, क्रीडा कर्मचारी आणि राखीव खेळाडूंचाही समावेश आहे. तर जाणून घेऊया १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम भारतीय खेळाडूंमध्ये कशी वाटली जाईल आणि त्यातील किती रक्कम कर म्हणून कापली जाईल.बीसीसीआयशिवाय आयसीसीनेही भारतीय संघाला सुमारे २० कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली आहे. तर प्रथम या रकमेवरील कराबद्दल बोलूया.
आतापर्यंतच्या एका अहवालात खेळाडूंना दोन प्रकारे पगार दिला जातो, असे सांगण्यात आले होते. खेळाडूंना त्यांच्या फीसह व्यावसायिक फी म्हणून पैसे दिल्यास, त्या रकमेवर ० टक्के टीडीएस कापला जाईल. कलम १९४ जेबी अंतर्गत या रकमेवर टीडीएस कापला जाईल. मग हा पैसा खेळाडूंच्या उत्पन्नात परावर्तित होईल आणि आयटीआरमध्ये आयकर निश्चित केला जाईल. दुसरीकडे, ही रक्कम खेळाडूंना बक्षीस म्हणून दिली, तर त्यानुसार कर आकारला जाईल. बक्षिसाच्या रकमेवर ३ टक्के टीडीएस आधीच कापला जाईल. मग या परिस्थितीत, रकमेवर ३० टक्क्यांपर्यंत कर कापून उर्वरित रक्कम खेळाडूंना दिली जाईल.
१२५ कोटी रुपयांच्या बक्षिसाची रक्कम कशी विभागली जाईल?
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम संघातील १५ सदस्य, ४ राखीव खेळाडू आणि संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सुमारे १५ सदस्यांमध्ये विभागली जाईल. यामध्ये संघातील प्रमुख १५ खेळाडूंना प्रत्येकी ५ कोटी रुपये दिले जाऊ शकतात. याशिवाय सपोर्ट स्टाफ आणि उर्वरित चार राखीव खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये दिले जाऊ शकतात.
© IE Online Media Services (P) Ltd