Virat Kohli says he hasn’t seen Rohit emotional in 15 years : टी-२० विश्वचषक २०२४ चा विजेता भारतीय संघासाठी मुंबईतील वानखडे स्टेडियमवर भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. स्टेडियमवर पोहोचण्यापूर्वी टीम इंडियाने विजयी परेड काढली. यानंतर टीम इंडियाचे खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविडने स्टेडियममध्ये टूर्नामेंटशी संबंधित आपल्या आठवणी शेअर केल्या. टीमचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने सत्कार समारंभात वानखेडे स्टेडियमवर खचाखच भरलेल्या प्रेक्षकांसमोर खुलासा केला की, १५ वर्षात त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माला कधीच इतके भावुक पाहिले नव्हते. ज्याचे टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीला मिठी मारताना डोळे ओलावले होते.
खुल्या बसमध्ये संस्मरणीय ‘विक्टरी परेड’नंतर आयोजित सत्कार समारंभात कोहली म्हणाला, “मी १५ वर्ष रोहितबरोबर खेळतोय, त्याला इतकं भावुक कधीच पाहिलं नाही. जेव्हा मी (केन्सिंग्टन ओव्हल) पायऱ्या चढत होतो, तेव्हा तो रडत होता आणि मीही रडत होतो.’ यानंतर विराट कोहली म्हणाला, मी २१ वर्षांचा असताना २१ वर्षे भारतीय क्रिकेटचा भार वाहणाऱ्या महान खेळाडू सचिन तेंडुलकरला आपल्या खांद्यावर घेतले होते.
‘आमच्या दोघांचे ध्येय एकच होते’ –
गेल्या आठवड्यात ट्रॉफी जिंकल्यानंतर कोहलीने क्रिकेटच्या या छोट्या स्वरूपातून निवृत्ती जाहीर केली होती. विराट कोहली म्हणाला, मी संघाचा कर्णधार होतो तेव्हा रोहित संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू होता. तसेच आता रोहित संघाचा कर्णधार होता, तेव्हा मी संघातील वरिष्ठ खेळाडू होतो. या दोन्ही वेळी आमच्या दोघांचे ध्येय एकच होते की भारतीय संघाला ट्रॉफी मिळवून द्यायची. जे आता सत्यात उतरले आहे. यानंतर विराट कोहलीने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतलेल्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – ‘मी हार्दिकची माफी मागते…’, टी-२० विश्वचषकानंतर लाइव्ह टीव्हीवर चाहतीने ‘त्या’ चुकीसाठी पंड्याला जोडले हात
‘आता मी वरिष्ठ खेळाडूंच्या त्या भावना समजू शकतो’ –
आपल्या टी-२० टी-२० आंतरराष्ट्रीय निवृत्तीवर बोलताना विराट कोहली म्हणाला, ‘सामना संपल्यानंतर मला कळले की आता वेळ आली आहे की पुढच्या पिढीने जबाबदारी स्वीकारली पाहिजे.’ २०११ मध्ये तो संघाचा सर्वात तरुण सदस्य होता. त्याने सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांना भावुक होताना पाहिले होते आणि कदाचित त्यांना त्यांची भावनिकता समजली नसेल. पण आता तो नीट समजू शकतो. तो म्हणाला, ‘त्या रात्री (२०११ विश्वचषक जिंकल्यानंतर) वरिष्ठ खेळाडूंच्या भावना मी समजू शकलो नाही, जेव्हा ते रडायला लागले होते, पण आता मी त्या समजू शकतो.’
हेही वाचा – आयसीसीच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’चे नामांकन जाहीर, रोहितला बुमराहसह ‘हा’ खेळाडू देतोय टक्कर, कोण मारणार बाजी?