रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर विराट कोहलीच्या नाबाद ८२ धावांच्या जोरावर, पाकिस्तानला भारताने ४ विकेटसने धूळ चारली. त्याचबरोबर टी-२० विश्वचषक २०२२ मधील आपल्या विजय नोंदवला. विराटने सुरुवातीला संघर्ष केला, नंतर हार्दिक पांड्यासोबत सामना जिंकणारी भागीदारी रचली. तसेच सामना संपल्यानंतर कोहलीने शेवटच्या दोन चेंडूंमध्ये अश्विनने दाखवलेल्या शौर्याचे कौतुक केले.

मोहम्मद नवाजने दिनेश कार्तिकला सामन्याती एक चेंडू बाकी असताना बाद केल्यानंतर, पाकिस्तानने आणखी एक ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली होती. कारण हाय-प्रेशर सामन्यात खेळपट्टीवर येणाऱ्या फलंदाजासाठी सोपे नसते.परंतु अश्विन दबावाखाली शांत होता आणि त्याने नवाजचा कुशलतेने सामना केला.

हेही वाचा – IND vs PAK T20 World Cup 2022 : नोंदवला गेला दर्शकसंख्येचा नवा विक्रम, किती जणांनी सामना पाहिला हे जाणून वाटेल आश्चर्य

आश्विनने लेग साईडच्या दिशेने जाणारा चेंडू खेळला नाही आणि तो वाईड गेला. आता भारताला विजयासाठी फक्त एका धावेची गरज होती, आणि सर्व क्षेत्ररक्षक जवळ आले असताना आश्विनने त्यांच्यावरुन चेंडू टोलवत भारताला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर कोहलीने अश्विनच्या या खेळीचे कौतुक केले. तसेच तो अश्विनच्या या कृत्याने आश्चर्यचकित झाल्याचे त्याने कबूल केले.

विराट सामन्यानंतर बोलताना म्हणाला, “जेव्हा तुम्हाला १५ किंवा १६ धावांची गरज असते आणि तुम्हाला दोन चेंडूत दोन धावा मिळतात, तेव्हा लोक थोडे आराम करू शकतात, बाकीचे पूर्ण झाले होईल असा विचार करून आनंदी होतात.”

सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्स सोबत बोलताना विराट म्हणाला, ”जेव्हा दिनेश कार्तिक बाद झाला, तेव्हा मी ऍशला चेंडू कव्हर्सवर मारायला सांगितले. पण ऍशने, त्याने डोक्याच्यावर अतिरिक्त डोकं लावलं. असे करणे त्याच्यासाठी शौर्याचे कृत्य होते. तसेच रेषेच्या आत येत त्याने तो एक वाइड चेंडू बनवला. त्याने गॅपमधून चेंडू टोलवला तर आम्ही नक्कीच सामना जिंकू, अशी फॉरवर्डची स्थिती होती.”

Story img Loader