Dinesh Karthik included in T20 World Cup 2024 : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेला १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर सुरू होत आहे. यावेळी टी-२० विश्वचषकात २० संघ सहभागी होत आहेत. यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. आता या स्पर्धेत दिनेश कार्तिक एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ एलिमिनेटर सामन्यातून बाहेर पडल्यानंतर आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली होता. दिनेश कार्तिक आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून या स्पर्धेत सहभागी झाला होता. या १७ वर्षांचा कार्यकाळात त्याने वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व केले. आता आयसीसीने कॉमेंट्री पॅनल जाहीर केले आहे. विशेष म्हणजे कॉमेंट्री पॅनेलमध्ये चार भारतीयांना स्थान मिळाले आहे, ज्यामध्ये दिनेश कार्तिकच्या नावाचा समावेश आहे.
या दिग्गजांना कॉमेंट्री पॅनेलमध्ये स्थान मिळाले –
कॉमेंट्री टीमचे नेतृत्व रवी शास्त्री, नासेर हुसेन, इयान स्मिथ, मेल जोन्स, हर्षा भोगले आणि इयान बिशप करत आहेत. आता पुरुष आणि महिला टी-२० विश्वचषक विजेते संघात सामील झाले आहेत. यामध्ये दिनेश कार्तिक, इबोनी रेनफोर्ड-ब्रेंट, सॅम्युअल बद्री, कार्लोस ब्रॅथवेट, स्टीव्ह स्मिथ, आरोन फिंच आणि लिसा स्थळेकर या नावांचा समावेश आहे.
दिनेश कार्तिक कॉमेंट्री पॅनेलमधील निवडीनंतर काय म्हणाला?
आयसीसी कॉमेंट्री पॅनेलमध्ये भारताकडून दिनेश कार्तिक, रवी शास्त्री, सुनील गावसकर आणि हर्षा भोगले यांचा समावेश आहे. आयसीसीने भारताच्या युवराज सिंगची ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. दिनेश कार्तिकने सांगितले की, ही स्पर्धा अनेक अर्थांनी वेगळी असेल, २० संघ, ५५ सामने ज्यामुळे ती आणखी रोमांचक होईल. मी या स्पर्धेत सहभागी होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. अशा उच्च-स्तरीय कॉमेंट्री पॅनेलचा भाग असणे ही एक चांगली भावना आहे. तसेच मी अलीकडे ज्या खेळाडूंसोबत खेळलो आहे त्यांच्यावर भाष्य करणे अधिक मनोरंजक असणार आहे.
हेही वाचा – T20 WC 2024 : युवराजनंतर ICCने शाहिद आफ्रिदीवर सोपवली मोठी जबाबदारी, गेल-बोल्टच्या यादीत सामील
कॉमेंट्री पॅनेलमध्ये सहभागी झालेले दिग्गज खेळाडू –
एकदिवसीय विश्वचषक विजेते रिकी पाँटिंग, सुनील गावसकर, मॅथ्यू हेडन, रमीझ राजा, इऑन मॉर्गन, टॉम मूडी आणि वसीम अक्रम हे देखील आगामी स्पर्धेत कॉमेंट्री करताना दिसतील. संघातील इतर मोठ्या नावांमध्ये डेल स्टेन, ग्रॅमी स्मिथ, मायकेल अथर्टन, वकार युनिस, सायमन डौल, शॉन पोलॉक आणि केटी मार्टिन तसेच एमपुमेलो एमबांगवा, नताली जर्मनोस, डॅनी मॉरिसन, ॲलिसन मिशेल, ॲलन विल्किन्स यांचा समावेश आहे. ब्रायन मुर्गाट्रॉयड, माइक हेजमन, इयान वॉर्ड, अथर अली खान, रसेल अर्नोल्ड, नियाल ओब्रायन, कॅस नायडू, जेम्स ओब्रायन आणि वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन गंगा यांचा समावेश आहे.