बांगलादेश संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर८ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे, ज्यामध्ये संघाला २१ जूनला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. बांगलादेशने त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात नेपाळचा २१ धावांनी पराभव करून पुढील फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. या सामन्यात बांगलादेश संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज तंजीम हसन शाकिबची नेपाळ संघाचा फलंदाज रोहित पौडेलशी भांडण झाले, ही घटना नेपाळच्या डावाच्या तिसऱ्या षटकात घडली. आता आयसीसीने तंजीम हसनला त्याच्या मॅच फीचा दंड ठोठावला आहे.

[quiziframe id=43 dheight=282px mheight=417px

Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Asaram Bapu
Asaram Bapu : आसाराम बापूला २०१३च्या बलात्कार प्रकरणात दिलासा! राजस्थान उच्च न्यायालयाने मंजूर केला अंतरिम जामीन
BCCI New Rule Team India Players May Receive Performance based variable pay After Test Defeat
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पराभव पडणार भारी; थेट पगारावर परिणाम होणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
nylon manjha, Kite festival
नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा
14-year old Ira Jadhav slams 346 in U19 cricket breaks Smriti Mandhanas record against Meghalaya
Ira Jadhav : १५७ चेंडू, ३४६ धावा आणि ४२ चौकार…इरा जाधवने स्मृती मानधनाला मागे टाकत झळकावले विक्रमी त्रिशतक
Jaideep Apte , bail , High Court,
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण, जयदीप आपटे याला उच्च न्यायालयाकडून जामीन
He asked me if I was still taking drugs Alex Hales accuses Tamim Iqbal after during BPL 2025 final controversy
BPL 2025 : ‘तू अजूनही ड्रग्ज घेतोस का?’, सामन्यानंतर तमीम इक्बाल आणि ॲलेक्स हेल्समध्ये मैदानातच जुंपली

दोन्ही खेळाडूंमध्ये वाद झाला आणि त्यानंतर हातवारेही करण्यात आले, ज्यामध्ये मैदानावरील पंच सॅम नोगाज्स्की यांनी मध्ये पडत त्या दोघांना बाजूला केले. या घटनेनंतर पंच बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोशी बोलतानाही दिसले.

हेही वाचा – न्यूझीलंडच्या वर्ल्डकपमधून घरवापसीचा पहिला दणका; केन विल्यमसनने सोडले कर्णधारपद

आयसीसीने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी बांगलादेश संघाचा वेगवान गोलंदाज तनझिम हसन शाकिबला त्याच्या मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावला आहे. तंजीम आयसीसीच्या आचारसंहितेच्या अनुच्छेद २.१२ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आहे. जे खेळाडू, सामनाधिकारी, सपोर्ट स्टाफ, पंच किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी अयोग्य वर्तन केल्याप्रकरणी आहे. तंजीमने सामनाधिकाऱ्यांसमोर आपल्यावरील हे आरोप मान्य केले होते. अशा परिस्थितीत या प्रकरणी कोणत्याही प्रकारची औपचारिक सुनावणी होणार नाही. नेपाळविरुद्धच्या या सामन्यात तंजीमने भेदक गोलंदाजी बांगलादेश संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यात त्याने ४ षटकांत केवळ ७ धावा देत ४ विकेट घेतले.

हेही वाचा – Super 8 Explainer: वर्ल्डकपमधील सुपर८चे सामने कसे खेळवले जाणार? काय आहे A1, B2 चं गणित; जाणून घ्या सविस्तर

तंजीम आणि रोहित पौडेलच्या भांडणाचा व्हीडिओ

तंजीम हसन साकिबच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे. २४ महिन्यांतील त्याचा हा पहिलाच गुन्हा होता. जेव्हा एखादा खेळाडू २४ महिन्याच्या कालावधीत चार किंवा अधिक डिमेरिट गुणांवर पोहोचतो, तेव्हा ते गुण निंलबनामध्ये बदलले जातात आणि खेळाडूला एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय किंवा दोन टी-२० सामन्यांकरता बंदी घालण्यात येते.

हेही वाचा – ‘हा भारतीय असणार…’ असं म्हणत हारिस रौफ चाहत्यावर गेला धावून, संतापलेल्या हारिसने पत्नीलाही ढकललं; VIDEO व्हायरल

टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये, बांगलादेश संघ २१ जून रोजी सुपर८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे, तर २२ जून रोजी भारताविरुद्ध दुसरा आणि २५ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध तिसरा सामना खेळेल. बांगलादेश संघाने ग्रुप स्टेजमधील ४ पैकी ३ सामने जिंकले होते, ज्यात त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

Story img Loader