Virat Kohli with the trophy of ICC ODI Player Of The Year 2023 : भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली सध्या टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत खेळण्यासाठी अमेरिकेत आहे. अमेरिकेत आयसीसीने कोहलीला आयसीसी ‘वनडे प्लेयर ऑफ द इयर २०२३’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. कोहलीला हा पुरस्कार गेल्या वर्षीच जाहीर होता, मात्र त्याला अमेरिकेत या पुरस्काराची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. आयसीसीने पुरस्कारासोबतचा कोहलीचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला असून त्यावर विराटला शुभेच्छा देत आहेत.
विराट कोहलीने २०२३ मध्ये आपल्या बॅटने शानदार प्रदर्शन केले होते. विराटने २७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६ शतके आणि ८ अर्धशतकांसह एकूण १३७७ धावा केल्या होत्या. २०२३ मध्ये कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १६६ धावा होती. एवढेच नाही तर कोहलीने एकदिवसीय विश्वचषकात आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. विराटने एकदिवसीय विश्वचषकाच्या ११ सामन्यात ७६५ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याच्या नावावर ३ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे.
या स्पर्धेतील त्याची सर्वोत्तम धावसंख्या ११७ धावा होती. या कामगिरीच्या जोरावर कोहली या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आणि विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिनला मागे टाकले. २००३ च्या विश्वचषकात सचिनने ६७३ धावा केल्या होत्या. याशिवाय कोहलीने सचिन तेंडुलकरचा वनडेमध्ये ४९ शतकांचा विक्रम मागे टाकत या फॉरमॅटमध्ये ५० वे शतक झळकावले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कोहलीने हा पराक्रम केला होता.
हेही वाचा – T20 WC 2024 : गोलंदाजीतील विलंब पडणार महागात, वर्ल्डकपपासून लागू होणार ‘स्टॉप क्लॉक’ नियम
भारताने १ जून रोजी बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळला होता ज्यामध्ये कोहली खेळला नव्हता. सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा ६० धावांनी पराभव केला होता. तसेच, भारतीय संघ ५ जूनला टी-२० विश्वचषकात आयर्लंडसोबत पहिला सामना खेळणार आहे. २००७ साली भारताने टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर टीम इंडियाला टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. २०२२ मध्ये इंग्लंडने शेवटच्या वेळी टी-२० विश्वचषक जिंकला होता. आता कोहली टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी अमेरिकेत आला आहे. कोहली टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. अशा परिस्थितीत या विश्वचषकातही त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.
हेही वाचा – VIDEO : रोहितला भेटण्यासाठी फॅन पोहोचला मैदानात, सुरक्षारक्षकाने पकडल्यानंतर हिटमॅनची रिॲक्शन व्हायरल
टी-२० विश्वषकासाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युजवराज, चहल पटेल. संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू: शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान