Jasprit Bumrah Jumps 42 Places in ICC Ranking : आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या टी-२० क्रमवारीत मोठा बदल झालेला आहे. टॉप-१० मध्ये अनेक मोठे आणि महत्त्वाचे बदल पाहायला मिळत आहेत. अनेक खेळाडूंनी आपल्या क्रमवारी प्रगती केली आहे, तर काहींना नुकसानही सहन करावे लागले आहे. दरम्यान, टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहने यावेळी क्रमवारीत सर्वात मोठी झेप घेतली आहे. जसप्रीत बुमराहसह टॉप-१० मध्ये जगातील कोणकोणत्या गोलंदाजांचा समावेश आहे जाणून घेऊया.

जसप्रीत बुमराहने ४२ स्थानांची घेतली मोठी झेप –

भारताचा सर्वोत्कृष्ट नव्हे तर जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहबद्दल बोलायचे, तर तो पहिल्या १० किंवा टॉप -५० मध्ये नाही, पण यावेळी त्याने नक्कीच मोठी झेप घेतली आहे. तो आता ४२ स्थानांनी प्रगती करत ६९ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग पॉइंट ४४८ आहे. मोहम्मद सिराजनेही १९ स्थानांची झेप घेतली आहे. त्याचे रेटिंग ४४९ असून तो ६८व्या स्थानावर आहे. टी-२० विश्वचषकाच्या आगामी सामन्यांमध्ये दोघांची कामगिरी अशीच राहिली तर लवकरच ते टॉप १० मध्ये आपले स्थान निश्चित करू शकतात.

India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings
Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल

आदिल रशीद टी-२० क्रिकेटचा नंबर वन गोलंदाज –

सध्या आयसीसी टी-२० क्रिकेटमधील नंबर वन गोलंदाज इंग्लंडचा आदिल रशीद आहे. तो सध्या ७०७ रेटिंग पॉइंटसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे ६७६ रेटिंग पॉइंट आहेत. अशा प्रकारे टॉप-२ मध्ये कोणताही बदल झालेला नसून अफगाणिस्तानचा रशीद खान आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने एकाचवेळी तीन स्थानांनी झेप घेतली आहे. त्याचे रेटिंग पॉइंट ६७१ आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या एनरिक नॉर्खियानेही चार स्थानांनी झेप घेतली आहे. तो ६६२ रेटिंग पॉइंटसह चौथ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – IND vs USA : भारत-अमेरिका सामना पावसामुळे रद्द झाला तर? ‘हा’ संघ सुपर-८ मध्ये पोहोचणार नाही, जाणून घ्या समीकरण

टॉप -१० यादीत कोणत्या गोलंदाजाचा समावेश?

अफगाणिस्तानच्या फजल हक फारुकीला एकाचवेळी ६ स्थानांचा फायदा झाला आहे. तो ६६२ च्या रेटिंगसह नॉर्खियासह संयुक्त चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडला थोडासा फटका बसला आहे. त्याची आता एका स्थानाने घसरन झाली आहे. हेझलवूडचे रेटिंग पॉइंट ६५८ असून तो सहाव्या क्रमांकावर आहे. भारताच्या अक्षर पटेललाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तो आता चार स्थानांनी घसरून सातव्या क्रमांकावर आला आहे. त्याचे रेटिंग पॉइंट ६५४ आहेत. वेस्ट इंडिजचा अकिल हुसेनही एका स्थानाने प्रगती करत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेचा महिशा तिक्षाना आणि भारताचा रवी बिश्नोई यांची घसरण झाली असली, तरी ते अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.