मेलबर्न येथे पाकिस्तान विरुद्ध त्याच्या टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी खेळणाऱ्या विराट कोहलीला आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीतही फायदा झाला आहे. किंबहुना, ताज्या आयसीसी क्रमवारीत त्याने ५ स्थानांनी झेप घेत पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले आहे. कोहली सध्या ६३५ गुणांसह ९व्या स्थानावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विराटच्या या प्रमोशनमागे पाकिस्तानविरुद्ध केलेली मुख्य खेळी हे प्रमुख कारण ठरले. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ५३ चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळी केली आणि अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार मारले.

मोहम्मद रिझवानचे अव्वल स्थान कायम

आयसीसी क्रमवारीतील प्रथम क्रमांकाबाबत बोलायचे झाले तर पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवान पहिल्या स्थानी कायम आहे. रिझवान ८४९ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचा ३६० डिग्री खेळाडू सूर्यकुमार यादवबद्दल याची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. सूर्यकुमार यादव पाकिस्तानविरुद्ध केवळ १५ धावा करू शकला. न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हॉन कॉनवे याने दुसरे स्थान पटकावले आहे. कॉनवेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ९२ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने १३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला त्याच्याच घरात पराभूत केले.

त्याच्या या खेळीने त्याला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, सूर्यकुमार यादव आणि एडन मार्कराम यांच्या पुढे नेले आहे. इतकंच नाही तर तो नंबर एक रिझवानसाठीही धोका ठरत आहे. आता त्याच्या आणि रिझवानमध्ये फक्त १८ गुणांचे अंतर उरले आहे.