Iceland Cricket mocks fans over wild T20 World Cup 2024 Prediction : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळली जात आहे. हा टी-२० विश्वचषक लोक दीर्घकाळ लक्षात ठेवतील. ही स्पर्धा अमेरिकेच्या खेळपट्ट्यांमधील असामान्य उसळी, टी-२० फॉरमॅटमधील कमी धावसंख्येच्या सामन्यांमधील खडतर स्पर्धा आणि इतर अनेक गोष्टींसाठी लक्षात राहील. अफगाणिस्तानचा पहिला सेमीफायनल आणि पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचणारा दक्षिण आफ्रिकाही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात राहील. पण याच दरम्यान आईसलँड क्रिकेट बोर्डाने केलेले एक जुने ट्वीट व्हायरल होत आहे.

खरं तर, टी-२० विश्वषक २०२४ ही स्पर्धी सुरू होण्यापूर्वी, आईसलँड क्रिकेटच्या ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ७ एप्रिल रोजी एक मोठे भाकीत केले होते की यावेळी दक्षिण आफ्रिका विश्वविजेता होणार आहे. आता आफ्रिकेने अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे, आईसलँड क्रिकेट बोर्डाने त्या भाकितावर टीका करणाऱ्यांना आता चोख प्रत्युत्तर दिले आहे.

आईसलँड क्रिकेट बोर्डाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये लिहले की, “जेव्हा आम्ही एप्रिल २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिका टी-२० विश्वचषक जिंकेल असे भाकीत केले, तेव्हा लोक हसत होते. ते अजूनही हसत आहेत, पण त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्टपणे दिसत आहे.” कारण दक्षिण आफ्रिकेने पहिल्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा ९ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता त्याची नजर गयाना येथे होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यावर असेल. या दोघांमधील विजेता संघ अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. मात्र, भारत-इंग्लंड सामन्यात मुसळधार पावसाची शक्यता असून सामना रद्द झाल्यास सुपर-८ च्या गुणतालिकेत अधिक गुण मिळवल्यामुळे टीम इंडिया फायनलमध्ये प्रवेश करेल.

हेही वाचा – IND vs ENG Semi Final 2 Live : गयानामध्ये पाऊस थांबला, ओल्या मैदानामुळे नाणेफेकीला विलंब

दक्षिण आफ्रिका आतापर्यंत टी-२० विश्वचषकात अजेय –

दक्षिण आफ्रिकेने २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. प्रथम, एडेन मार्करमच्या नेतृत्वाखाली गट डी मध्ये असताना, आफ्रिकेने आपले सर्व ४ सामने जिंकले आणि संघ-८ गुणांसह आपल्या गटात अव्वल स्थानावर राहिला. त्यानंतर सुपर-८ टप्प्यात आफ्रिकेने अमेरिका, इंग्लंड आणि शेवटी वेस्ट इंडिजचा पराभव करत उपांत्य फेरीचे तिकीट पटकावले. आता हा संघ अफगाणिस्तानला हरवून प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाने पण आतापर्यंत एकही सामना गमावला नाही.

हेही वाचा – ‘प्रत्येकजण शिक्षा झाली पाहिजे म्हणतोय…’, गुलबदीनच्या ‘फेक इंजरी’वर अश्विनचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘तो आपल्या देशासाठी…’

पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव करत टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. यंदाच्या विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. यासह अफगाणिस्तान संघाचे प्रथमच विश्वचषक फायनल खेळण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. दक्षिण आफ्रिकेने हा सामना ९ विकेट्सने जिंकला, अफगाणिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना ५६ धावा करून सर्वबाद झाला. तर दक्षिण आफ्रिकेने ८.५ षटकांत ५७ धावांचे लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेसाठी रीझा हेंड्रिक्स २९ धावा करून नाबाद परतला आणि कर्णधार एडन मारक्रम २३ धावा करून नाबाद परतला. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकीने एकमेव विकेट घेतली.