पाकिस्तानचा फलंदाज इफ्तिखार अहमदने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० विश्वचषक २०२२ च्या सुपर-१२ टप्प्यातील सर्वात मोठा षटकार ठोकला. लुंगी एनगिडीच्या षटकात त्याच्या बॅटमधून १०६ मीटर लांब षटकार आला. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या या स्पर्धेत सर्वात मोठे षटकार लगावणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे तर इफ्तिखार अहमद या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत शीर्षस्थानी यूएईचा जुनैद सिद्दीकी आहे. ज्याने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या फेरीत १०९ मीटर लांब षटकार लगावला आहे.

या विश्वचषकात सर्वाधिक लांब षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत, पण या यादीत एकाही भारतीयाचे नाव नाही. टॉप १० मधील सर्वात लहान षटकार ९८ मीटरचा आहे, जो मायकेल जोन्स, मार्कस स्टोइनिस आणि लॉर्कन टकर यांनी लगावले आहेत.

टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये सर्वाधिक लांब षटकार ठोकणारे टॉप १० फलंदाज –

जुनैद सिद्दीकी (यूएई) – १०९ मीटर विरुद्ध श्रीलंका
इफ्तिखार अहमद (पाक)- १०६ मीटर विरुद्ध दक्षिण आफ्रिका
ओडियन स्मिथ (वेस्ट इंडिज) – १०६ मीटर विरुद्ध आयर्लंड
डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका) – १०४ मीटर विरुद्ध भारत
रोव्हमन पॉवेल (वेस्ट इंडिज) – १०४ मीटर विरुद्ध झिम्बाब्वे
मिचेल मार्श (ऑस्ट्रेलिया) – १०२ मीटर विरुद्ध आयर्लंड
ऍरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) – १०२ मीटर विरुद्ध न्यूझीलंड
मायकेल जोन्स (स्कॉटलंड) – ९८ मीटर विरुद्ध आयर्लंड
मार्कस स्टॉइनिस (ऑस्ट्रेलिया) – ९८ मीटर विरुद्ध श्रीलंका
लॉर्कन टकर (आयर्लंड) – ९८ मीटर विरुद्ध ऑस्ट्रेलिया

पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याबद्दल बोलायचे तर इफ्तिखार अहमद (५१) आणि शादाब खान (५२) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १८५ धावा केल्या होत्या. परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे सामना १४ षटकांचा करण्यात आला. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाला १४२ धावांचे नवीन लक्ष्य मिळाले होते.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : २१ वर्षीय पाकिस्तानच्या खेळाडूने एनरिक नॉर्खियाला ठोकला जबरदस्त षटकार, पाहा व्हिडिओ

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ ९ बाद १०८ धावा करु शकला. त्यामुळे त्यांना ३३ धावांनी पराभव स्विकारावा लागला. सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी या सामन्यात विजयाची नोंद करणे पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचे होत. जर पाकिस्तान आज हरला असता तर ते स्पर्धेतून बाहेर पडले असते.

Story img Loader