टी२० विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा कर्णधार म्हणून शानदार कामगिरी करत आहे. रोहित भारतीय संघाला या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापर्यंत घेऊन गेला आहे. रविवारी (दि. ०६ नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात या स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीतील शेवटचा सामना पार पडला. हा सामना भारताच्या पारड्यात पाडला. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला हरवत मोठा अपसेट केला. त्यामुळे पाकिस्तानचा उपांत्य फेरीसाठीचा रस्ता मोकळा झाला. पाकिस्ताने बांगलादेशवर पाच गडी राखून विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे ग्रुप २ मधून भारत आणि पाकिस्तान या दोन संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे.

तर ग्रुप १ मध्ये न्यूझीलंडने आयर्लंडवर मोठा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ग्रुप १ मध्ये  ७ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करणारा न्यूझीलंड हा पहिला संघ ठरला होता. तर इंग्लंडने ही श्रीलंकेला धूळ चारत ग्रुप १ मधून उपांत्य फेरीत पोहचण्याचा दुसरा मान पटकावला. पण न्यूझीलंड आणि इंग्लंड यांचे गुण जरी समान असले तरी देखील नेट रनरेट मात्र न्यूझीलंडचा चांगला असल्याने ते पहिल्या क्रमांकावर आहेत.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
Champions Trophy Cricket Tournament BCCI demand to organize matches in Dubai sport news
पाकिस्तानात खेळण्यास नकारच! दुबईत सामने आयोजित करण्याची ‘बीसीसीआय’ची मागणी

हेही वाचा :   T20 World Cup 2022: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली पहिल्यांदाच ठरला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’

आता ग्रुप १ मधील पहिला संघ हा ग्रुप २ मधील दुसऱ्या संघाशी ९ नोव्हेंबरला पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात भिडणार आहे. तर उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामना हा ग्रुप २ मधील पहिला संघ आणि ग्रुप १ मधील पहिला संघ यांच्यात १० नोव्हेंबरला होणार आहे. म्हणजेच न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान आणि भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीतील सामने रंगणार आहेत.

याच दोन उपांत्य फेरीतील सामन्यांसाठी आयसीसीने अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यासाठी मॅरेस इरास्मस आणि रिचर्ड इलिंगवर्थ हे मैदानावरील पंच असणार आहेत तर रिचर्ड केटलबरो तिसरे पंच आणि मायकेल गॉफ हे चौथे पंच असणार आहे. न्यूझीलंड-पाकिस्तान सामन्यासाठी ख्रिस ब्रॉड सामनाधिकारी म्हणून असणार आहेत.

हेही वाचा :   बुंदेसलीगा फुटबॉल लीग सामन्यादरम्यान ‘फिफा विश्वचषक बॅन’ झळकले पोस्टर्स, काय आहे नेमके कारण जाणून घ्या

उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यासाठी कुमार धर्मसेना आणि पॉल रीफेल हे मैदानावरील (ऑन-फिल्ड) पंच असणार आहेत्त. तर ख्रिस गॅफनी तिसरे पंच आणि रॉड टकर (चौथे पंच) असणार आहेत. भारत-इंग्लंड सामन्यासाठी डेव्हिड बून सामनाधिकारी असणार आहेत. अंतिम सामन्यासाठीच्या अधिकाऱ्यांची निवड ही १२ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.