टी२० विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा कर्णधार म्हणून शानदार कामगिरी करत आहे. रोहित भारतीय संघाला या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापर्यंत घेऊन गेला आहे. रविवारी (दि. ०६ नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात या स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीतील शेवटचा सामना पार पडला. हा सामना भारताच्या पारड्यात पाडला. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला हरवत मोठा अपसेट केला. त्यामुळे पाकिस्तानचा उपांत्य फेरीसाठीचा रस्ता मोकळा झाला. पाकिस्ताने बांगलादेशवर पाच गडी राखून विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे ग्रुप २ मधून भारत आणि पाकिस्तान या दोन संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in