चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असतात. काहीवेळा चाहत्यांचे शेअर केलेले व्हिडिओ मीम्स बनवणाऱ्यांसाठी मसाला बनतात. रविचंद्रन अश्विनचा असाच एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी२० सामन्याचा आहे. अश्विनचा हाच व्हिडीओ सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत तब्बल १५ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. कदाचित अश्विनला त्यावेळी आपण कॅमेऱ्यात दिसू याची कल्पना नसावी पण कॅमेरामनच्या नजरेतून अश्विनची ही एक कृती काही सुटलेली नाही.

आता आर. अश्विनने यावर ट्विटर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो की, “ मी या टीम इंडियाच्या जर्सीची साईज होते का मला ते चेक करत होतो. पण कॅमेऱ्यावाल्याने मात्र हे सर्व सोडून मी या जर्सीचा परफ्युमसारखा वास घेत आहे असा अंदाज लावला. एखादा राहिला असता तर साईज, शर्ट व्यवस्थितपणे होतो आहे का वेगेरे असे अंदाज लावले असते पण त्याच्या कल्पना शक्तीची दाद दिली पाहिजे.” असे म्हणत त्याने यावर हसऱ्या स्माईल च्या इमोजी टाकल्या आहेत.

sadhguru jaggi vasudev isha foundation
“आम्ही कुणालाही लग्न करायला वा संन्यासी व्हायला सांगत नाही”, जग्गी वासुदेव यांच्या ‘इशा फाऊंडेशन’चं ‘त्या’ आरोपांवर स्पष्टीकरण!
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
Tips for Returning to Work After a Career Break
करिअरमध्ये मोठा ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा नव्याने कामाची सुरुवात कशी करावी? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
Mahalakshmi Murder Case
Mahalakshmi Murder Case : महालक्ष्मीची हत्या का केली? आरोपीने आत्महत्या करण्यापूर्वी काय सांगितलं होतं? मुक्तीरंजन रायच्या आईचा धक्कादायक खुलासा
Wife suicide case, Court, husband scold wife,
न्यायालय म्हणाले, “पतीने पत्नीला सुनावणे चुकीचे नाही….”
aarya slapped nikki tamboli bigg boss marathi 5
आर्याने निक्कीला मारलं ते दृश्य प्रेक्षकांना का दाखवलं नाही? रितेश देशमुख कारण सांगत म्हणाला, “घरात…”
Yograj Singh Shares Incident of His Father Said My Father Killed a Tiger Smeared its blood on my lips and Forehead
Yograj Singh: “माझ्या वडिलांनी वाघाची शिकार करून रक्त माझ्या ओठाला लावलं…”, युवीच्या बाबांनी सांगितला धक्कादायक किस्सा
Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…

नेमका किस्सा काय आहे

नेमकं झालं असं की, अश्विनला आपलं टीशर्ट शोधायचं होतं, अनेकदा मॅचच्या गडबडीत सर्वच खेळाडूंचे कपडे एकत्र मिक्स होतात, यात आपलं टीशर्ट ओळखण्यासाठी आश्विन चक्क टीशर्टचा वास घेताना दिसत आहे. हे पाहून अनेक भारतीयांना आपल्या हॉस्टेलचे दिवस आठवले आहेत. आपले कपडे लेखण्याची हीच खरी पद्धत आहे असेही अनेकांनी म्हंटले आहे.

हेही वाचा :  T20 World Cup: टी२० वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा धोका या खेळाडूकडून, पाकिस्तान संघाचा मेंटॉर मॅथ्यू हेडनचे विधान 

हा व्हिडिओ क्रिकेटर अभिनव मुकुंदने शेअर केला आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात नाणेफेक करताना बोलताना दिसत आहे. दरम्यान, टीम इंडियाचा अनुभवी ऑफस्पिनर आर अश्विन भारतीय क्रिकेट संघाचे दोन टी-शर्ट तपासताना दिसला.