मर्यादित षटकांमधील क्रिकेटचा तिसरा विश्वचषक रविवारी इंग्लंडने जिंकला. डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम करनचा (३/१२) भेदक मारा आणि दडपणाखाली आपला खेळ उंचावण्यासाठी ओळखला जाणाऱ्या बेन स्टोक्सच्या (४९ चेंडूंत नाबाद ५२ धावा) अर्धशतकामुळे इंग्लंडने रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानवर पाच गडी राखून मात करत दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तसेच या विश्वविजयासह इंग्लंडने नवा इतिहासही रचला. एकाच वेळी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक आपल्याकडे बाळगणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला. या विजयानंतर एकीकडे इंग्लंडचा संघ आणि समर्थकांकडून उत्साहामध्ये सेलिब्रेशन केलं जात असतानाच दुसरीकडे पाकिस्तानी संघाला मात्र ट्रोल केलं जात आहे. विशेष म्हणजे भारताला नमवून अंतिम फेरीत पोहोचलेल्या इंग्लंडचं कौतुक करताना पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी केलेल्या ट्वीटवरुनही पुन्हा त्यांना ट्रोल केलं जात आहे. त्यातही खास बाब म्हणजे आता थेट भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनीच पाकिस्तानी पंतप्रधानांना क्लिन बोल्ड केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> Eng vs Pak: ‘कर्माने हरलात’ टीकेवरुन शाहीद आफ्रिदीचा मोहम्मद शामीला सल्ला; म्हणाला, “तू तर सध्या संघाचा भाग आहेस त्यामुळे…”

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इंग्लंडने भारताला दहा गडी राखून पराभूत केल्यानंतर ट्विट केलं होतं. भारताच्या लाजिरवाण्या पराभवावर अप्रत्यक्षपणे त्यांनी उपहासात्मक टीका केली. “या रविवारी (१३ नोव्हेंबर रोजी) १५२/० विरुद्ध १७०/० असा सामना होणार आहे,” असं ट्वीट त्यांनी केलं होतं. इंग्लंडने ज्याप्रमाणे भारताचा पराभव केला तसाच पराभव यापूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या संघाने भारताचा केला होता. २०२१ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये १० गडी राखून भारतावर पाकिस्तानने विजय मिळवला होता त्यावेळी पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी शानदार फलंदाजी केली होती. या सामन्यात पाकिस्तानने बिनबाद १५२ धावा करत सामना १० गडी राखून जिंकला होता. त्याच पार्श्वभूमीवर शरीफ यांनी रविवारी भारताला १५२/० असं पराभूत करणारे म्हणजेच पाकिस्तान विरुद्ध १७०/० असं पराभूत करणारे म्हणजेच इंग्लंडच्या संघांदरम्यान सामना होणार असल्याचं ट्वीट केलं होतं.

नक्की वाचा >> World Cup Final आणि कर्म! पाकिस्तानच्या पराभवानंतर रोहित, विराटची टिंगल करण्यावरुन शाहीन आफ्रिदीला भारतीयांनी झापलं

नक्की वाचा >> World Cup: पाकिस्तानचे PM इरफानकडून क्लिन बोल्ड; 152/0 vs 170/0 वर म्हणाला, “तुमच्यात अन् आमच्यात हाच फरक आहे की आम्ही…”

शाहबाज यांच्या या ट्वीटला पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडदरम्यानच्या अंतिम सामन्याचा निकाल लागल्यानंतर म्हणजेच रविवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास लेफ्टनंट जनरल (निवृत्त) कनवाल जीत सिंग ढिल्लोण यांनी भन्नाट उत्तर दिलं. ढिल्लोण यांनी पाकिस्तान पराभूत झाल्यानंतर शाहबाज यांचं ट्वीट कोट करुन त्यावर प्रतिक्रिया नोंदवली. “९३ हजार विरुद्ध शून्य हा अजूनही न भेदता आलेला स्कोअर आहे, जय हिंद” अशा अर्थाचं ट्वीट ढिल्लोण यांनी केलं.

नक्की वाचा >> T20 World Cup Final: …म्हणून इंग्लंडच्या संघातील खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरले

बांगलादेश युद्धामध्ये पाकिस्तानने शरणागती पत्कारली तेव्हा ९३ हजार पाकिस्तानी सैनिक भारताला शरण आले होते. त्याचाच हा संदर्भ ढिल्लोण यांनी दिला आहे. विशेष म्हणजे भारतीय लष्कराशी संबंधित इतर अधिकाऱ्यांनीही या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना ढिल्लोण यांचं समर्थन केलं आहे.

नक्की वाचा >> “…म्हणून धोनीने जोगिंदर शर्माला शेवटची ओव्हर दिली”; २००७ च्या भारत-पाकिस्तान World Cup Final बद्दल शोएब मलिकचा खुलासा

ढिल्लोण हे डिसेंबर १९८३ ते जानेवारी २०२२ पर्यंत भारतीय लष्करी सेवेमध्ये कार्यरत होते. त्यांना टायनी या टोपणनावाने ओळखलं जातं. त्याच नावाने त्यांचं हे ट्वीटर हॅण्डल असून त्यांनी केलेलं ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind army ex lieutenant general kjs dhillon epic reply to pak pm shehbaz sharif as england wins t20 world cup against pakistan scsg