India Beat Australia by 24 Runs: रोहित शर्माची फटकेबाजी आणि संघाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर शानदार २४ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्याचवेळी हा विजय टीम इंडियासाठी खूप खास आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाने विश्वविक्रमही केला आहे. रोहित शर्माची झंझावाती ९२ धावांची खेळी भारतीय संघासाठी निर्णायक ठरली. रोहित शर्मासह शिवम दुबे आणि हार्दिक पंड्याच्या फिनिशिंगसह भारताने २० षटकांत २०५ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ १८१ धावाच करू शकला. मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड कांगारू संघाचा डाव सावरला खरा पण कुलदीपने वेळीच दोन मोठ्या विकेट घेत भारताचे सामन्यात पुनरागमन केले.

भारताने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. संघाने पहिल्याच षटकात ६ धावांवर वॉर्नरची विकेट गमावली. पण हेड पुन्हा एकदा भारतासाठी डोकेदुखी बनून आला आणि त्याने मिचेल मार्शसह ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. मार्शला दोन वेळा जीवदान मिळवले आणि दोघांनी मिळून भारतीय गोलंदाजांवर दबाव आणला. पण हिटमॅनच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत संघाला सामन्यात परत आणले.

हेही वाचा – IND vs AUS Live Score, T20 World Cup 2024: रोहित शर्माचा झंझावात ठरला निर्णायक; ऑस्ट्रेलियाला नमवत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये

हेही वाचा – ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने मार्शचा सीमारेषेवर अचंबित करणारा झेल टिपला. जो सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. यानंतर कुलदीपने मॅक्सवेलला क्लीन बोल्ड केलं आणि इथून भारताने सामन्यात पुनरागमन करण्यास सुरूवात केली. पण हेड मात्र फटकेबाजी करत होताच तेव्हाच जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा टीम इंडियासाठी हिरो ठरला. त्याने चार षटकांत २९ धावा देत १ विकेट मिळवली, पण ती एक विकेट संघासाठी महत्त्वपूर्ण ठरली. त्याने धोकादायक ट्रॅव्हिस हेडला बाद करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. डावाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन फलंदाजांना वेगवान धावा काढण्याची संधीही दिली नाही.

हेही वाचा – Ind vs Aus T20 World Cup: रोहित शर्माने वादळी खेळी आणि ट्रॅव्हिस हेडचा झेल पकडत केली अहमदाबादची परतफेड

अर्शदीप सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या होत्या. आपल्या स्पेलमध्ये त्याने टीम डेव्हिड, डेव्हिड वॉर्नर आणि वेडच्या विकेट घेतल्या आणि संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तर अक्षर पटेलने ३ षटकांत २१ धावांत १ विकेट घेतली. याशिवाय मार्शचा धोकादायक झेल घेत त्याने टीम इंडियाला सामन्यात परत आणले.

भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. रोहित शर्माच्या कर्णधार खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ५ विकेट गमावून २०५ धावा केल्या. रोहित शर्माने ४१ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ८ षटकार मारले. तर, सूर्यकुमार यादवने १६ चेंडूत ३१ धावांचे योगदान दिले. शिवम दुबेने २८ आणि हार्दिक पांड्याने नाबाद २७ धावा केल्या.

हेही वाचा – IND v AUS: कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला

भारतीय संघाचा टी-२० वर्ल्डकपमध्ये विश्वविक्रम

या विजयासह टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विश्वविक्रमही केला आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात टीम इंडियाने आतापर्यंत ५० सामने खेळले आहेत. या कालावधीत ३४ सामने जिंकले आहेत तर १५ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह भारतीय संघाने श्रीलंकेला मागे टाकले आहे. श्रीलंकेने टी-२० विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत ३ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका ३१ विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

टी-२० विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकणारे संघ
भारत – ३४ विजय

श्रीलंका – ३३ विजय
दक्षिण आफ्रिका – ३१ विजय
पाकिस्तान – ३० विजय
ऑस्ट्रेलिया – ३० विजय