Kamran Akmal big statement on Virat Kohli Batting Position : टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी, पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने भारतीय संघाला फलंदाजी संदर्भात महत्त्वाचा इशारा दिला. अकमलच्या मते, भारताचा फलंदाजी क्रम सध्या ठीक नाही. त्याला वाटते की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी पाकिस्तानविरुद्ध सलामी देऊ नये. कारण नेहमीप्रमाणे किंग कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी योग्य आहे. विराट त्याच्या नेहमीच्या शैलीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना संघाला विजय मिळवून देऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहलीसाठी तिसरा क्रमांकच योग्य –

कामरान अकमलने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “मला सध्या भारताची फलंदाजी योग्य वाटत नाही. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर दबाव सहन करू शकतो आणि सामना पूर्ण करू शकतो. त्यामुळे टीम इंडियासाठी हे महत्त्वाचे आहे. यशस्वी जैस्वालने रोहित शर्मासह फलंदाजीची सलामी दिली पाहिजे आणि कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर यावे. त्याचवेळी भारताने रोहित-कोहलीला सलामीवीर म्हणून मैदानात उतरवले, तर त्यांचे हे समीकरण कधीही फसू शकते. तिसऱ्या क्रमांकावर कोहली एक टोक धरून सामना संपवू शकतो. त्यामुळे मला वाटतं कोहलीला सलामी पाठवून भारत चूक करत आहे.”

भारत न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानपेक्षा अधिक प्रभावी –

पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलने भारताने आयर्लंडवर ८ विकेट्सने मिळवलेल्या शानदार विजयाचे कौतुक केले. कामरान अकम म्हणाला की, “भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा न्यूयॉर्कच्या परिस्थितीत अधिक प्रभावी असेल. कारण बुमराहने आयर्लंडविरुद्ध चांगली गोलंदाजी केली आहे. त्याचबरोबर हार्दिक पंड्यानेही विकेट्स घेतल्या आहेत. तसेच सिराजनेही चांगली कामगिरी केल्यामुळे भारताचा आत्मविश्वास बळावला असेल. विशेष म्हणजे भारतीय संघ एकाच ठिकाणी तिसरा सामना खेळणारा असल्याने त्याचाही त्यांना फायदा होईल.”

हेही वाचा – IND vs PAK : भारताविरुद्धच्या सामन्यात तरी पाकिस्तानला ‘आर्मी ट्रेनिंग’ तारणार का? सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

कामरान अकमलने सांगितल्याप्रमाणे भारताने पहिल्यांदा बांगलादेशविरुद्ध नासाऊ येथे सराव सामना खेळला होता. त्यानंतर टी-२० विश्वचषकातील पहिला सामना आयर्लंडविरुद्ध याच मैदानावर खेळला होता. यानंतर आता पाकिस्तानविरुद्धही तिसरा सामना पण इथेच खेळायचा आहे. अशा प्रकारे या खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभव भारताला मिळाला आहे. त्यामुळे तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वर्चस्व निर्माण करु शकतो. त्याचबरोबर बाबर आझमच्या संघाने न्यूयॉर्कमधील डलास येथील ग्रँड प्रेरी स्टेडियममध्ये अमेरिकेविरुद्ध पहिला सामना खेळला आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2024 : IND vs PAK सामन्यात नाणेफेकीचा कौल ठरणार निर्णायक, काय आहे कारण जाणून घ्या इतिहास?

भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० विश्वचषक सामन्यांचे निकाल (२००७ नंतर पासून)

१. भारत विरुद्ध पाकिस्तान – २०१२ टी-२० विश्वचषक – भारत ८ विकेट्सनी विजयी
२. भारत विरुद्ध पाकिस्तान – २०१४ टी-२० विश्वचषक – भारत ७ विकेट्सनी विजयी
३. भारत विरुद्ध पाकिस्तान – २०१६ टी-२० विश्वचषक – भारत ६ विकेट्सनी विजयी
४. भारत विरुद्ध पाकिस्तान – २०२१ टी-२० विश्वचषक – पाकिस्तान १० विकेट्सनी विजयी
५. भारत विरुद्ध पाकिस्तान – २०२२ टी-२० विश्वचषक – भारत ४ विकेट्सनी विजयी

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind s pak t20 wc 2024 kamran akmal warns before match vs pakistan if virat kohli opens india might get stuck vbm
Show comments