Ravindra Jadeja Lifts Rahul Dravid Video Viral: टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये टीम इंडियाने पहिला सुपर८ सामना अफगाणिस्तानसोबत खेळत ४७ धावांनी जिंकला. हा सामना जिंकून टीम इंडियाने पहिल्या गटातील गुणतालिकेत आपले खाते उघडले. अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये संघाने चांगली कामगिरी केली. ज्याप्रमाणे प्रत्येक सामन्यानंतर अप्रतिम क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला ड्रेसिंग रूममध्ये बेस्ट फिल्डरचे मेडल पदक दिले जाते, त्याचप्रमाणे या सामन्यानंतरही एका खेळाडूला त्याच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणासाठी हा पुरस्कार मिळाला. ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

हेही वाचा – IND v AFG: भारताच्या विजयानंतर प्लेईंग इलेव्हनवर रोहित शर्माचे मोठे वक्तव्य, म्हणाला; भविष्यातील सामन्यांमध्ये तीन गोलंदाज….

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?

भारतीय संघाने अफगाणिस्तानच्या संपूर्ण संघाला झेलबाद ऑल आऊट केले. टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं की भारताने संपूर्ण संघाला झेलबाद करत ऑल आऊट केले. त्यामुळे भारत-अफगाणिस्तान सामन्यानंतर १-२ नव्हे ४ खेळाडूंना बेस्ट फिल्डरच्या मेडलसाठी दावेदारी मिळाली. या मेडलाचा पहिला दावेदार अर्शदीप सिंग होता, ज्याने जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर नजीबुल्ला झादरानचा धारदार झेल घेतला. दुसरा दावेदार रवींद्र जडेजा होता. अक्षर पटेलचीही या यादीत निवड करण्यात आली असून, त्याने अझमतुल्ला उमरझाईचा शानदार झेल घेण्यासोबतच क्षेत्ररक्षणात चांगलीच मेहनत दाखवली. आपलं नाव जाहीर होताच अक्षर आश्चर्यचकित झाला. हे पाहून विराटनेही त्याची खिल्ली उडवली. तर शेवटचा दावेदार ऋषभ पंत होता ज्याने गेल्या वेळेस हे पदक जिंकले होते.

हेही वाचा – IND vs AFG सामन्यात भारतीय संघ हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? BCCI ने सांगितलं नेमकं कारण

भारत-अफगाणिस्तान सामन्यातील बेस्ट फिल्डरला मेडल देण्यासाठी खास राहुल द्रविड यांना पाचारण करण्यात आलं. द्रविड यांनी काही न बोलता थेट मेडल नेऊन रवींद्र जडेजाच्या गळ्यात घेतले. मेडल मिळताच जडेजाने सरळ द्रविड यांना उचलूनच घेतले. हा व्हीडिओमधील एक कमाल क्षण होता. मेडल मिळताच जडेजाने हे मेडल महत्त्वाचे असल्याचे म्हटले तर सिराजकडून हे मेडल मिळवण्यासाठी प्रभावित झाल्याचं त्याने म्हटलं. ज्याचा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा – T20 WC 2024: टीम इंडियाने पार केली ‘अफगाण खिंड’; सूर्यकुमार यादवची अर्धशतकी खेळी ठरली निर्णायक

भारत-अफगाणिस्तान सामन्याचा लेखाजोखा
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर १८१ धावा केल्या. यादरम्यान उपकर्णधार हार्दिक पंड्यानेही ३२ धावांची शानदार खेळी केली. भारताच्या या धावसंख्येसमोर अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ १३४ धावांवर गडगडला. जसप्रीत बुमराह गोलंदाजीत चमकला, त्याने ४ षटकांत केवळ ७ धावा देत ३ विकेट घेतले.

Story img Loader