Indian Team Is Wearing Black Arm Bands on Hand in IND vs AFG: टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत वि अफगाणिस्तानमधील सुपर८ फेरीतील सामने आमनेसामने आले आहेत. बार्बाडोसमधील केनिंग्स्टन ओव्हल या स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. भारताने या सामन्याची नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडी मैदानात उतरली तेव्हा हे दोघेही हातावर काळी फित घालून उतरले. पण यामागचं नेमकं कारण काय आहे, जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात एक बदल केला आहे. मोहम्मद सिराजच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अफगाणिस्ताननेही संघात बदल केला आहे. करीम जनातच्या जागी हजरतुल्ला झाझईचा संघात समावेश करण्यात आला आहे.

आज म्हणजेच २० जून रोजी भारतीय क्रिकेटवर शोककळा पसरली. भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांचा मृत्यू झाला. बंगळुरू येथील त्यांच्या अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून ५२ वर्षीय भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी समोर आले. हे आत्महत्येचे प्रकरण आहे का, याचा तपास सुरू असल्याची प्रतिक्रिया स्थानिक पोलिसांनी दिली. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर या खेळाडूंनी एक्सवर पोस्ट करत आपली श्रद्धांजली वाहिली. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक निवेदन जारी करत सांगितले, माजी भारतीय वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन यांच्या स्मरणार्थ भारतीय संघ आज हातावर काळी फित बांधून मैदानात उतरेल.

जॉन्सनने आपल्या कारकिर्दीत दोन कसोटी आणि ३९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ते कर्नाटक संघाचा महत्त्वाचा भाग होते. अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद आणि डोडा गणेश यांच्यासह कर्नाटकच्या गोलंदाजीचा ते महत्त्वाचा भाग होते. भारताचे माजी वेगवान गोलंदाज आणि जॉन्सन यांचा जवळचा मित्र गणेश म्हणाला की, “ही धक्कादायक बातमी आहे. कारण आम्ही आमच्या टेनिस क्रिकेटच्या दिवसांपासून जय कर्नाटक नावाच्या क्लबसाठी एकत्र खेळलो आहोत.”

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind v afg why team india players are wearing black armbands in super 8 clash know the reason bdg
Show comments