ICC T20 World Cup 2024, IND vs AFG Highlights:
टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये टीम इंडियाची विजयी मालिका सुरूच आहे. गुरुवारी झालेल्या सुपर८ सामन्यात भारताने अफगाणिस्तानविरुद्ध ४७ धावांनी विजय मिळवला. बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर भारताने प्रथम फलंदाजी करताना १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ निर्धारित २० षटकांत १३४ धावांत गारद झाला. अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला ओमरझाई (२६) याने सर्वाधिक धावा केल्या. नजीबुल्ला झदरन (१९), गुलबदिन नायब (१७), आणि मोहम्मद नबी (१४), नूर अहमद (१२) आणि सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज यांनी ११ धावांचे योगदान दिले. इब्राहिम झादरान (८) आणि हजरतुल्ला झाझई (२) यांनाही विशेष काही करता आले नाही. भारताकडून जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत ७ धावा देऊन ३ विकेट घेतले. अर्शदीप सिंगनेही तीन विकेट घेतले. तर कुलदीप यादवने दोन, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १८१ धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवने २८ चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने झंझावाती अर्धशतक झळकावले. भारताची सुरूवात अजिबातच चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्माने (८) स्वस्तात विकेट गमावली. विराट कोहलीने (२४) ऋषभ पंत (२०) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. शिवम दुबे (१०) फार मोठी खेळी करू शकला नाही. सूर्यकुमारने हार्दिक पांड्यासोबत (३२) पाचव्या विकेटसाठी ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. १७व्या षटकात सूर्या आणि १८व्या षटकात हार्दिक पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्यकुमारला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. रवींद्र जडेजाने ७ आणि अक्षर पटेलने १२ धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तानकडून कर्णधार रशीद खान आणि फजलहक फारुकीने प्रत्येकी तीन विकेट घेतले. नवीन उल हकला एक विकेट मिळाली.
T20 World Cup 2024, Afghanistan vs India Highlights: टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर एट सामन्यात भारताने अफगाणिस्तानला ऑल आऊट करत 48 धावांनी मोठा विजय मिळवला.
अर्शदीपने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर अफगाणिस्तानला ऑल आऊट करत तब्बल ४८ धावांनी शानदार विजय मिळवला. बुमराह-अर्शदीपच्या जोडीने ३-३ विकेट्स घेत बॅकफूटवर टाकले आणि सूर्याच्या अर्धशतकी खेळीने संघाला सामन्यात कायम ठेवले.
१८ व्या षटकात अर्शदीपने शानदार गोलंदाजी करत सलग दोन लागोपाठ विकेट्स मिळवले. यासह अफगाणिस्तानचा संघाला सामन्यापासून अधिक दूर नेले. सुरूवातीच्या दोन षटकांमध्ये धुलाई झाल्यानंतर अर्शदीपने पुन्हा एकदा आपला क्लास दाखवला.
१७व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर कुलदीपने चालाखी करत चेंडू टाकला आणि तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात जडेजाकरवी झेलबाद झाला.
बुमराहने १६व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा एका सामन्यात तीन विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने नजीबुल्लाहला अर्शदीपकरवी झेलबाद केले. यासह अफगाणिस्तान सामन्यात अधिक बॅकफूटवर गेला आहे.
कुलदीपनंतर जडेजाच्या खात्यातही विकेट मिळाली आहे. जडेजाने यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमधील आपली पहिली विकेट मिळवली आहे. कुलदीपनंतर जडेजाने १२ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सेट झालेल्या अझमतुल्ला ओमरझाईला पॅव्हेलियनमध्ये धाडले. ओमरझाई आणि गुलबदीन चांगली भागीदारी रचत होते पण भारताच्या गोलंदाजांनी ही भागीदारी तोडत मोठी विकेट मिळवली. ओमरझाईने २० चेंडूत २६ धावा करत बाद झाला
नो बॉलने पहिले षटक सुरू केले आणि दुसऱ्या षटकात येताच विकेट घेतली. कुलदीपने ११व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर गुलबदीन झेलबाद झाला. कुलदीपच्या चेंडूवर मोठा फटका खेळायला गेला पण चेंडू हवेत उंच उडाला आणि पंतने पुढे येत शानदार झेल टिपला. गुलबदीनने २१ चेंडूत १२ धावा करत बाद झाला.
अफगाणिस्तानने पॉवरप्लेमध्ये ३ बाद ३५ धावा केल्या आहेत. रहमानुल्ला गुरबाजने पहिल्याच षटकात तुफान फटकेबाजी केली आणि १६ धावा केल्या पण बुमराहने पुढच्या षटकात विकेट घेतली तर चौथ्या पाचव्या षटकात अक्षर आणि बुमराहने विकेट घेत अफगाणिस्तानच्या धावांना ब्रेक लावला.
पाचव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बुमराहने हजरतुल्ला झाझाईला झेलबाद केले. यासह अफगाणिस्तानच्या धावांना मोठा ब्रेक लागला आहे.
अक्षर पटेलला चौथे षटक देण्यात आले आणि या षटकात त्याने येताच विकेट मिळवली. अफगाणिस्तानचा मोठा फलंदाज इब्राहिम झादरानला अक्षरने झेलबाद केले. इब्राहिमचा झेल स्वत थेट रोहितच्या हाती दिला. यासह ४ षटकांनंतर अफगाणिस्तानने २ बाद २३ धावा केल्या.
पहिल्याच षटकात अफगाणिस्तानच्या रहमानुल्ला गुरूबाजने १३ धावा केल्या. यानंतर रोहितने बुमराहला पाचारण केले. दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बुमराहच्या चेंडूने गुरबाजच्या बॅटची कड घेतली आणि चेंडू थेट पंतच्या हातात गेला. यासह बुमराहने येताच पुन्हा एकदा आपली कामगिरी चोख बजावली आणि भारताला महत्त्वाची विकेट मिळाली.
व्हीडिओ
https://x.com/StarSportsIndia/status/1803832417620197408
अफगाणिस्तानकडून पहिल्याच षटकात फटकेबाजी पाहायला मिळाली. अर्शदीपच्या पहिल्याच षटकात रहमानुल्ला गुरबाजने एक चौकार आणि एका षटकारासह १६ धावा केल्या. अफगाणिस्तानने एक चांगली सुरूवात करत भारताला धक्का दिला आहे.
अक्षर पटेलने अखेरच्या षटकात १४ धावा करत भारताची धावसंख्या १८० पार नेली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १८१ धावा केल्या. ऋषभ पंतची पॉवरप्लेमधील धडाकेबाज खेळी, सूर्याची विस्फोटक फलंदाजी, हार्दिक पंड्याची फटकेबाजी आणि अक्षर पटेलची अखेरच्या षटकातील हुशार खेळीच्या जोरावर भारताने एक चांगली धावसंख्या उभारली आहे. अफगाणिस्ताननेही शानदार गोलंदाजी केली पण भारतीय संघाची फलंदाजी बाजू कायमच एक पाऊल पुढे राहिली. यासह भारताने अफगाणिस्तानला विजयासाठी १२० चेंडूत १८२ धावांचे लक्ष्य दिले आहे. अफगाणिस्तानकडून कर्णधार रशीद खान आणि फजलहक फारूकी यांनी प्रत्यकी ३ विकेट घेतल्या तर नवीन उल हकने १ विकेट मिळवली.
सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्यानंतर रवींद्र जडेजाही झेलबाद झाला. स्लोअर चेंडूवर जडेजा बाद झाला. लागोपाठ भारताला तीन धक्के बसले असून धावसंख्या १६७ च्या आसपास आहे. यासह भारताने १८ षटकांमध्ये ७ बाद १६८ धावा केल्या आहेत.
सू्र्यकुमार यादवने २८ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने झंझावाती अर्धशतक झळकावले. भारतीय संघाला १५० धावांपर्यंत नेण्यामध्ये सूर्याने मोठी भूमिका बजावली. यासह भारताने १७ षटकांनंतर ५ बाद १५० धावा केल्या.
सूर्यकुमार यादवच्या तुफानी पटकेबाजीसह पंड्याही मोठे फटके खेळत आहे. नूर अहमदच्या षटकातील पाचव्या चेंडूवर हार्दिकने एक दणदणीत षटकार लगावला. हार्दिकचा षटकार लगावलेला चेंडू स्टेडियमच्या एका बॉक्सवर जाऊन आदळला. यावर विराट कोहली आणि रोहित शर्माची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. सगळ्यांना आश्चर्यचकित करणाऱ्या भन्नाट फटक्यांसह सूर्याने सर्वांचेच मनोरंजन करत धावांमध्ये भर घातली. पण पुढच्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.
सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ४ बाद १२६ धावा केल्या आहेत. पुढील ५ षटकांत भारत किती धावा करू शकणार यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. सूर्यकुमार आणि हार्दिकची जोडी मैदानात कायम आहे.
शिवम दुबेने येताच मोठा षटकार खेळत त्याने दणक्यात सुरूवात केली. पण रशीदने पंत आणि विराटनंतर शिवम दुबेलाही आपल्या जाळ्यात अडकवले. ११ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शिवम दुबे पायचीत झाला. रशीद टाकलेल्या चेंडूने बॅटची कड न घेताच थेट पॅडला लागला आणि तो बाद झाला.
पॉवरप्लेमध्ये चांगली फटकेबाजी करत ऋषभ पंत आणि विराटने भारताचा डाव सावरला. भारताने १० षटकांत ३ बाद ७९ धावा केल्या आहेत. सध्या मैदानात सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेची जोडी आहे.
रोहित पंतनंतर विराट कोहलीसुध्दा बाद झाला आहे. रशीद खानच्या फिरकीने अखेरीस त्याने आपल्या जाळ्यात अडकवले. नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विराट कोहली बाद झाला. एका षटकारासह २४ चेंडूत २४ धावा करत विराट बाद झाला.
रशीद खानच्या फिरकीच्या जाळ्यात ऋषभ पंत अडकला आणि पायचीत होत पॅ्हेलियनमध्ये परतला. यासह भारताला अजून एक मोठा धक्का बसला आहे. पॉवरप्लेमध्ये झटपट धावा केल्यानंतर रशीदच्या सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर पायचीत झाला. चौकारांची हॅट्ट्रिक साधल्यानंतर पंत बाद झाला. ११ चेंडूत ४ चौकारांसह झटपट २० धावा केल्या. तर ७ षटकांनंतर भारताची धावसंख्या २ बाद ५४ धावा केल्या.
रोहित शर्माच्या विकेटनंतर ऋषभ पंत येताच त्याने जोरदार फटकेबाजी सुरू केली. पहिल्याच चेंडूवर पंतने चौकार मारला तर विराटनेही आपले फटके लगावले. यासह भारताने ६ षटकांत १ बाद ४७ धावा केल्या. ऋषभ पंत आणि विराट कोहलीची जोडी मैदानात कायम आहे.
रोहित शर्मा पुन्हा एकदा निराश करत ८ धावा करून झेलबाद झाला. तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळताना रोहित शर्मा आऊट झाला. फजलहक फारूकीच्या खात्यात मोठी विकेट आली आहे. तीन षटकांनंतर भारताची धावसंख्या १ बाद १६ धावा.
भारत अफगाणिस्तानच्या सुपर८ सामन्याला सुरूवात झाली आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत असून सलामीवीर विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी मैदानात उतरली आहे. तर अफगाणिस्तानकडून चमकदार गोलंदाजी केलेला फजलहक फारूकीच्या हातात नवा चेंडू आहे. पहिल्या षटकात भारताने ५ धावा केल्या.
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला जद्रान, हजरतुल्ला झाझाई, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी
भारत अफगाणिस्तान सामन्याची नाणेफेक भारतीय संघाने जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात मोठा बदल झाला असून मोहम्मद सिराजच्या जागी कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. तर अफगाणिस्तानच्या संघातही एक बदल झाला असून करीम जनतच्या जागी हजरतुल्ला झाझाई याला संधी देण्यात आली.
भारत-अफगाणिस्तान सामन्याच्या वेळेस बार्बाडोसमध्ये पावसाची शक्यता होती. पण मैदानात ऊन पडलं असून दोन्ही संघ या सामन्यापूर्वी सराव करताना दिसत आहेत. विराट कोहलीसह भारतीय संघातील काही खेळाडू फुटबॉलही खेळत आहेत.
२०१० च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि अफगाणिस्तान भिडले होते.या सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला होता. २०१० च्या सामन्यातील रवींद्र जडेजा हा एकमेव खेळाडू यंदाच्या भारतीय संघात आहे आणि त्याने चेंडूने कमाल कामगिरी केली होती. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ ११५ धावा करता आल्या. यादरम्यान नूर अली झाद्रानने सर्वाधिक ५० धावा केल्या होत्या. तर टीम इंडियाकडून आशिष नेहराने तीन विकेट घेतल्या. जडेजाने ४ षटकांत केवळ १५ धावा दिल्या होत्या आणि १ विकेट मिळवली आणि टीम इंडियाने अवघ्या १४.५ षटकांत हे लक्ष्य गाठले.
राहुल द्रविडने सामन्याच्या एक दिवस आधी अफगाणिस्तान संघाबद्दल म्हटले, "त्यांच्याकडे खूप चांगले गोलंदाजी आक्रमण आहे. फजलहक फारुकी आणि नवीन-उल-हक चेंडू खूप चांगले स्विंग करतात. आम्हाला त्यांच्या गोलंदाजीचा सामना करावा लागेल. "आशा आहे की आम्ही चांगली धावसंख्या उभारू किंवा त्यांनी ठरवलेले लक्ष्य यशस्वीपणे गाठू."
भारताने साखळी फेरीत तीन सामने जिंकले, तर शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला. तर रशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान संघाला विजयाची हॅट्ट्रिक साधल्यानंतर अखेरच्या साखळी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.