ICC T20 World Cup 2024, IND vs AFG Highlights:
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये टीम इंडियाची विजयी मालिका सुरूच आहे. गुरुवारी झालेल्या सुपर८ सामन्यात भारताने अफगाणिस्तानविरुद्ध ४७ धावांनी विजय मिळवला. बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर भारताने प्रथम फलंदाजी करताना १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ निर्धारित २० षटकांत १३४ धावांत गारद झाला. अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला ओमरझाई (२६) याने सर्वाधिक धावा केल्या. नजीबुल्ला झदरन (१९), गुलबदिन नायब (१७), आणि मोहम्मद नबी (१४), नूर अहमद (१२) आणि सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज यांनी ११ धावांचे योगदान दिले. इब्राहिम झादरान (८) आणि हजरतुल्ला झाझई (२) यांनाही विशेष काही करता आले नाही. भारताकडून जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत ७ धावा देऊन ३ विकेट घेतले. अर्शदीप सिंगनेही तीन विकेट घेतले. तर कुलदीप यादवने दोन, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १८१ धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवने २८ चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने झंझावाती अर्धशतक झळकावले. भारताची सुरूवात अजिबातच चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्माने (८) स्वस्तात विकेट गमावली. विराट कोहलीने (२४) ऋषभ पंत (२०) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. शिवम दुबे (१०) फार मोठी खेळी करू शकला नाही. सूर्यकुमारने हार्दिक पांड्यासोबत (३२) पाचव्या विकेटसाठी ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. १७व्या षटकात सूर्या आणि १८व्या षटकात हार्दिक पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्यकुमारला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. रवींद्र जडेजाने ७ आणि अक्षर पटेलने १२ धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तानकडून कर्णधार रशीद खान आणि फजलहक फारुकीने प्रत्येकी तीन विकेट घेतले. नवीन उल हकला एक विकेट मिळाली.
T20 World Cup 2024, Afghanistan vs India Highlights: टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर एट सामन्यात भारताने अफगाणिस्तानला ऑल आऊट करत 48 धावांनी मोठा विजय मिळवला.
आजच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माला सावध खेळी खेळावी लागेल. अफगाणिस्तानच्या कर्णधाराने रोहित शर्माला टी-२० मध्ये ४० चेंडूत चार वेळा बाद केले आहे, त्यामुळे आज आपण पॉवरप्लेमध्ये रशीदला गोलंदाजी करताना पाहू शकतो.
टी-२० क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान एकूण ८ वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने ७ वेळा विजय मिळवला आहे आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. अफगाणिस्तानला आजपर्यंत एकाही टी-२० सामन्यात भारताला पराभूत करता आलेले नाही.
ICC T20 World Cup 2024 AFG vs IND Highlights: भारतीय संघाने अफगाणिस्तानवर विजय मिळवत सुपर एट मधील मोहिमेला विजयाने सुरूवात केली आहे. पहिलाच सामना जिंकत विजयी सलामी दिली आहे.