ICC T20 World Cup 2024, IND vs AUS Live Score: रोहित शर्माच्या ४१ चेंडूत ९२ धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २०५ धावांचा डोंगर उभारला. ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला पण दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला १८१ धावातच रोखलं. या विजयासह भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये धडक मारली. ऑस्ट्रेलियाचं सेमी फायनलचं स्वप्न अफगाणिस्तान-बांगलादेश लढतीच्या निर्णयावर अवलंबून आहे. सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी होणार आहे.
T20 World Cup 2024, India vs Australia Live Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये सुपर सुपर८ फेरीतील करो या मरो सामना खेळवला जात आहे.
कुलदीप यादवने ग्लेन मॅक्सवेलला त्रिफळाचीत करत तर अक्षर पटेलने मार्कस स्टॉइनसला बाद केलं. दोन विकेट्ससह भारतीय संघाने दमदार पुनरागमन केलं.
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात अफलातून झेल घेत मिचेल मार्शची खेळी संपुष्टात आणली. मिचेल मार्शने मारलेला फटका षटकार होण्याच्या बेतात होता. अक्षर पटेलने उंच उडी मारुन जबरदस्त झेल टिपला. मार्शने २८ चेंडूत ३७ धावांची खेळी केली.
कर्णधार मिचेल मार्श आणि भारताविरुद्ध दमदार कामगिरी करणारा ट्रॅव्हिस हेड यांनी चौकार-षटकारांची लयलूट सुरू केली आहे.
डावखुरा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने ऑस्ट्रेलियाच्या भरवशाच्या डेव्हिड वॉर्नरला पहिल्याच षटकात तंबूत परतावलं. वॉर्नरने ६ धावा केल्या.
कर्णधार रोहित शर्माच्या ४१ चेंडूत ९२ धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०५ धावांचा डोंगर रचला. सेमी फायनल प्रवेशासाठी विजय अनिवार्य अशा सामन्यात भारतीय संघाने अर्धी मोहीम फत्ते केली आहे.
फटकेबाजीच्या प्रयत्नात असलेल्या शिवम दुबेला मार्कस स्टॉइनसने बाद केलं. डेव्हिड वॉर्नरने चांगला झेल टिपला. शिवमने २२ चेंडूत २८ धावांची खेळी केली.
अॅडम झंपाच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमणाच्या प्रयत्नात भारतीय फलंदाजांना जीवदान मिळालं. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने हार्दिकचा झेल सोडला. दुबेचा फटका क्षेत्ररक्षकांच्या मध्यात पडला.
रोहित शर्माने एका षटकात २९ धावा वसूल केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज मिचेल स्टार्क जोरदार पुनरागमन केलं आहे. रोहितला त्रिफळाचीत केल्यानंतर स्टार्कने सूर्यकुमार यादवला बाद केलं आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा मोह सूर्याला आवरता आला नाही आणि स्टंप्सपाठी मॅथ्यू वेडने सोपा झेल टिपला. सूर्याने १६ चेंडूत ३१ धावांची खेळी केली.
रोहित शर्माने ४१ चेंडूत केलेल्या ९२ धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघ दोनशे धावांचा टप्पा ओलांडण्याची चिन्हं आहेत. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे मुक्तपणे फटकेबाजी करत आहेत. फलंदाजीसाठी पोषक अशा खेळपट्टीवर दोघांनीही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली आहे.
फिरकी आक्रमणाविरुद्ध तडाखेबंद फटकेबाजी करू शकतो यासाठीच संघात घेतलेल्या शिवम दुबेने ऑस्ट्रेलियाचा भरवशाचा फिरकीपटू अॅडम झंपाच्या चेंडूवर जोरदार षटकार लगावत चांगली सुरुवात केली.
विक्रमी ९२ धावांची खेळी करत रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर १३ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बोल्ड झाला. स्टार्कने राऊंड द विकेट टाकलेल्या चेंडूवर चेंडू पायाला लागत त्रिफळा उडवला आणि रोहित बाद झाला. बाद होण्यापूर्वी रोहितने ४१ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकार ९२ धावा केल्या आहेत.
रोहित शर्माच्या तुफानी फटकेबाजीसह भारताने २ बाद ११४ धावा केल्या आहेत. एकट्या रोहित शर्माने ८९ धावा केल्या आहेत. तर ऋषभ पंत १५ धावा करत बाद झाला. तर सूर्या ७ धावा करत मैदानावर आहे.
स्टॉइनसच्या आठव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर ऋषभ पंत झेलबाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हेजलवूडकडून झेलबाद झाला. त्याने १४ चेंडूत एक चौकार आणि षटकारासह १५ धावा केल्या. तर ८ षटकांनंतर भारताची धावसंख्या २ बाद ९३ धावा आहे.
पॉवरप्लेमध्ये भारताने १ बाद ६० धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या झंझावाती अर्धशतकासह भारताने झटपट धावा केल्या आहेत. विराट कोहली बाद झाल्याचा रोहित शर्माने चांगलाच बदला घेतला आहे. तर संधी मिळताच ऋषभ पंतही फटकेबाजी करत आहे.
हिटमॅन रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मोठ्या सामन्यात अवघ्या १९ चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावले आहे. यादरम्यान रोहितने ५ षटकार आणि ४ चौकार लगावले आहेत. या झंझावाती अर्धशतकासह रोहितने वैयक्तिक वेगवान अर्धशतक केले आहे.
पावसामुळे पाचव्या षटकातील पहिल्या चेंडूनंतर सामना थांबला होता.
पाचवे षटक टाकायला आलेल्या कमिन्सच्या पहिल्या चेंडूवर दणदणीत षटकार लगावत त्याचे स्वागत केले. पण पावसाने हजेरी लावल्याने सामना थांबवण्यात आला आहे. भारताची धावसंख्या सध्या १ बाद ४३ धावा आहे.
सामन्याच्या तिसऱ्या षटकातील स्टार्कच्या गोलंदाजीवर रोहितचा हिटमॅन अवतार पाहायला मिळाला. स्टार्कच्या पहिल्याच चेंडूपासून रोहितने आक्रमक अंदाज दाखवत षटकार मारला. दुसऱ्या चेंडूवरही षटकार लगावला तर तिसऱ्या चेंडूवर चौकार अन् परत चौथ्या चेंडूवर षटकार लगावत स्टार्कची बोलती बंद केली. पाचवा चेंडू डॉट बॉल गेला आणि मग सहावा चेंडू वाईड टाकला त्यानंतर पुन्हा एकदा रोहितने दणदणीत षटकार लगावला, आणि एकाच षटकात २९ धावा कुटल्या.
स्टार्कचे तिसरे षटक
पहिला चेंडू – षटकार
दुसरा चेंडू – षटकार
तिसरा चेंडू – चौकार
चौथा चेंडू – षटकार
पाचवा चेंडू – डॉट बॉल
सहावा चेंडू – षटकार
दुसऱ्या षटकातील हेझलवूडच्या गोलंदाजीवर विराट कोहली शून्यावर बाद झाला. ५ चेंडू खेळत विराट एकही धाव करू शकला नाही आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. टीम डेव्हिडने मागे धावत जात एक शानदार झेल टिपला. यासह भारत १ बाद ६ धावांवर खेळत आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याला सुरूवात झाली असून भारताकडून रोहित-विराटची जोडी मैदानात आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने गोलंदाजीला सुरूवात केली आहे. दुसऱ्याच चेंडूवर रोहित शर्मा बाद असल्याचे अपील केले. पण रोहितने फटका मारलेला चेंडू एक टप्पा पडून गेल्याने रोहित नाबाद राहिला. पुढच्या चेंडूवर दणदणीत चौकार लगावला. यासह पहिल्या षटकात भारताने ५ धावा केल्या.
हायव्होल्टेज सामन्यापूर्वी भारत-ऑस्ट्रेलियाचे दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात हजर झाले आहेत.
ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (य़ष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (य़ष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची नाणेफेक ऑस्ट्रेलिया संघाने जिंकली असून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ फलंदाजीने या सामन्याला सुरूवात करणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात एक मोठा बदल झाला असून अँश्टन अगरच्या जागी मिचेल स्टार्क संघात परतला आहे. तर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना २४ जून रोजी सेंट ल्युसिया येथे स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता सुरू होईल. त्याच वेळी, हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवला जाईल. परंतु हवामान अहवालानुसार, सेंट ल्युसियामध्ये सकाळी पावसाची ५५ टक्के शक्यता आहे आणि तापमान ३२ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय येऊ शकतो.
सेंट ल्युसियात पाऊस थांबला असून दोन्ही संघ मैदानावर मोठ्या सामन्यासाठी सराव करत आहेत. थोड्याच वेळात या सामन्यासाठी टॉस होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी विराट कोहली भारतीय संघाशी बोलतानाही दिसला.
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीसाठी सज्ज होत असताना झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या दौऱ्यासाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. शुबमन गिल संघाचे नेतृत्व करणार आहे. आयपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या नितीश कुमार रेड्डी, रायन पराग आणि तुषार देशपांडे यांना या संघात स्थान पटकावलं आहे.
ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कऐवजी अॅश्टन अगरला खेळवलं होतं. वर्ल्डकप स्पर्धेत मिचेल स्टार्कची कामगिरी नेहमीच चांगली असते. घोटीव यॉर्कर, प्रतिस्पर्धी फलंदाजांना हैराण करणारा उसळते चेंडू टाकण्यात स्टार्क वाकबगार आहे. भारताविरुद्ध अगरऐवजी स्टार्क अंतिम अकरात खेळण्याची दाट शक्यता आहे. अॅडम झंपाच्या बरोबरीने ग्लेन मॅक्सवेल फिरकी आक्रमणाची जबाबदारी सांभाळण्याची शक्यता आहे.
इंग्लंड दक्षिण आफ्रिकेचा सामना ज्या खेळपट्टीवर खेळवण्यात आला तीच खेळपट्टी भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी वापरली जाणार आहे. सेंट ल्युसियात पाऊस थांबला असून, सुपर सॉपर मशीन्स मैदानातलं पाणी बाहेर काढत आहेत.
वर्ल्डकपच्या सुपर८ दुसऱ्या गटाचं चित्र स्पष्ट झालं आहे. दक्षिण आफ्रिकेने रोमहर्षक लढतीत यजमान वेस्ट इंडिजला नमवत दिमाखात सेमी फायनल फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेत ७ पैकी ७ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे इंग्लंडने अमेरिकेचा धुव्वा उडवत सेमी फायनल फेरी गाठली आहे. एकाक्षणी गतविजेत्या इंग्लंडला सुपर८ टप्पा गाठता येणं खडतर दिसत होतं मात्र या फेरीत त्यांनी लौकिकाला साजेसा खेळ केला आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध कोण खेळणार हे काही तासात स्पष्ट होईल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान-बांगलादेश सामन्यानंतर सेमी फायनलचं संपूर्ण चित्र कळेल.
ICC T20 World Cup 2024 IND vs AUS Live Score: टी-२० विश्वचषक २०२४ मधील सुपर८ फेरीतील अजून एक हायव्होल्टेज सामना भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला जात आहे. भारताने जर हा सामना जिंकला तर संघ थेट सेमीफायनलमध्ये धडकणार आहे.