ICC T20 World Cup 2024, IND vs AUS Live Score: रोहित शर्माच्या ४१ चेंडूत ९२ धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २०५ धावांचा डोंगर उभारला. ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला पण दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला १८१ धावातच रोखलं. या विजयासह भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये धडक मारली. ऑस्ट्रेलियाचं सेमी फायनलचं स्वप्न अफगाणिस्तान-बांगलादेश लढतीच्या निर्णयावर अवलंबून आहे. सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

T20 World Cup 2024, India vs Australia Live Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये सुपर सुपर८ फेरीतील करो या मरो सामना खेळवला जात आहे.

17:08 (IST) 24 Jun 2024
IND vs AUS Live: भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होणार?

सेंट लुसियावरील खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असल्याने भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. मोहम्मद सिराजच्या पुनरागमनामुळे कोणता खेळाडू बाहेर होऊ शकतो, असा प्रश्न आहे. कुलदीप यादवने गेल्या दोन सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे, तर अक्षर पटेलने चेंडू आणि बॅटने संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. अशा स्थितीत आजच्या सामन्यात जर कोणी फिरकीपटूच्या जागी सिराजला संघात परत घ्यायचे असेल तर रोहित आणि संघासमोर मोठा पेच असणार आहे.

16:36 (IST) 24 Jun 2024
IND vs AUS Live: सेंट लुसियाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल

सेंट लुसियामधील खेळपट्टीच्या क्युरेटरने सांगितले की, ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल, अशा परिस्थितीत रोहित शर्मा फिरकी गोलंदाजाऐवजी मोहम्मद सिराजला संघात स्थान देऊ शकतो. पण कोणत्या खेळाडूला या मोठ्या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनबाहेर करणार यावर सर्वांच्या नजरा असतील.

16:31 (IST) 24 Jun 2024
IND vs AUS Live: आजचा विजय ऑस्ट्रेलियासाठी का महत्त्वाचा

ऑस्ट्रेलियासाठी आज भारताविरुद्ध विजय मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आज जर कांगारू संघ हरला तर त्यांना स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे. अफगाणिस्तानचा पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध आहे. अफगाणिस्तान संघाने तो सामना जिंकला आणि ऑस्ट्रेलिया भारताकडून हरला तर अफगाणिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

16:28 (IST) 24 Jun 2024
IND vs AUS Live: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचे सावट

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सेंट लुसिया येथे होणार आहे आणि आज म्हणजेच २४ जून रोजी याठिकाणी मुसळधार पाऊस आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल, तर ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका असेल.

16:27 (IST) 24 Jun 2024
IND v AUS Live: हेड टू हेड

टी-२० विश्वचषकात आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकूण ५ सामने खेळवले गेले आहेत. यापैकी ३ सामने भारताने जिंकले आहेत तर ऑस्ट्रेलियाने २ सामने जिंकले आहेत.

ICC T20 World Cup 2024 IND vs AUS Live Score: टी-२० विश्वचषक २०२४ मधील सुपर८ फेरीतील अजून एक हायव्होल्टेज सामना भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला जात आहे. भारताने जर हा सामना जिंकला तर संघ थेट सेमीफायनलमध्ये धडकणार आहे.