ICC T20 World Cup 2024, IND vs BAN Live Score : टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर ८ फेरीत आज भारत आणि बांगलादेश आमनेसामने होते. अँटिगा येथील नॉर्थ साऊंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ५० धावांनी धुव्वा उडवला. त्याचबरोबर सुपर ८ फेरीतील टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे. यासह भारतीय संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना उपकर्णधार हार्दिक पंड्याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावार ५ बाद १९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ केवळ १४६ धावा करू शकला. भारताकडून धावांचा बचाव करताना फिरकीपटू कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
ICC T20 World Cup 2024 IND vs BAN Highlights : भारत आणि बांगलादेश टी-२० विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत पाच वेळा आमनेसामने आले आहेत. या पाचही सामन्यात भारताने बांगलादेशवर मात केली आहे. त्याचबरोबर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे दोन्ही १३ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यापैकी १२ सामन्यात भारताने तर एका सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला आहे.
हार्दिक पंड्याच्या अर्धशतकानंतर, मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने सुपर 8 टप्प्यातील सामन्यात बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच गड्यांच्या मोबदल्यात 196 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 146 धावाच करू शकला.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करत बांगलादेशला सातवा धक्का दिला. रिशाद हुसेन 10 चेंडूत 24 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यातील बुमराहची ही दुसरी विकेट आहे.
https://twitter.com/dehatiladka07/status/1804571740728602733
भारतीय संघ जिंकणार हे जवळपास निश्चित झाले आहे. झाकेर अलीला बाद करून अर्शदीप सिंगने बांगलादेशला सहावा धक्का दिला. आता बांगलादेशची धावसंख्या 16.4 षटकात 6 बाद 116 धावा आहे. तर विजयासाठी 20 षटकात 197 धावा करायच्या होत्या.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कर्णधार नझमुल हुसेन शांतोला बाद केल्याने बांगलादेशचा डाव गडगडला. शांतो चांगली फलंदाजी करत होता, पण बुमराहविरुद्ध मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. बुमराहने अर्शदीप सिंगला झेलबाद करून शांतोचा डाव संपवला. शांतो 32 चेंडूत 40 धावा करून बाद झाला.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कर्णधार नझमुल हुसेन शांतोला बाद केल्याने बांगलादेशचा डाव गडगडला. शांतो चांगली फलंदाजी करत होता, पण बुमराहविरुद्ध मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. बुमराहने अर्शदीप सिंगला झेलबाद करून शांतोचा डाव संपवला. शांतो 32 चेंडूत 40 धावा करून बाद झाला.
शाकिब पॅव्हेलियनमध्ये परतला
मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने चमकदार कामगिरी सुरू ठेवत बांगलादेशला चौथा धक्का दिला. अनुभवी फलंदाज शाकिब अल हसनला बाद करत कुलदीपने भारताला चौथे यश मिळवून दिले. सात चेंडूत ११ धावा करून शकीब बाद झाला. या सामन्यातील कुलदीपची ही तिसरी विकेट आहे.
https://twitter.com/XForMatchTwets/status/1804564821305872624
कुलदीप यादवने आपल्या गोलंदाजीने बांगलादेशला पुन्हा एकदा अडचणीत आणले. त्याने नवीन फलंदाज म्हणून आलेल्या तौहीद हदयला बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. अशाप्रकारे बांगलादेशचा तिसरा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. आता बांगलादेशची धावसंख्या 12 षटकात 3 गडी बाद 80 धावा आहे.
मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने अप्रतिम गोलंदाजी करत तांझिद हसनला बाद करून बांगलादेशला दुसरा धक्का दिला. तांझिदची कर्णधार नजमुल हुसेनबरोबर चांगली भागीदारी होत होती, मात्र कुलदीपने एलबीडब्ल्यू आऊट होऊन तांझिदचा डाव संपवला.
बांगलादेशने पहिल्या 6 षटकात 1 गडी बाद 42 धावा केल्या. यादरम्यान लिटन दास 13 चेंडूत 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. लिटन दासला हार्दिक पांड्याने बाद केले. सध्या नजमुल हसन शांतो आणि तांझिद हसन क्रीजवर आहेत.
हार्दिक पंड्याने सलामीवीर लिटन दासला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. लिटनने तांझिट हसनसह बांगलादेशला दमदार सुरुवात करून दिली होती, मात्र ही भागीदारी तोडण्यात हार्दिकला यश आले. लिटन 10 चेंडूत 13 धावा करून बाद झाला.
https://twitter.com/sunilkmamroli/status/1804556240019959850
भारताने दिलेल्या 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बांगलादेशचे सलामीवीर उतरले आहेत. बांगलादेशची सुरूवात संथ झाली असून भारताकडून चांगली गोलंदाजी केली जात आहे. या षटकात 5 धावा झाल्या.
उपकर्णधार हार्दिक पंड्याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने सुपर एट फेरीतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशसमोर विजयासाठी 197 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यानंतर भारतीय संघाला 20 षटकांत 5 गडी गमावून 196 धावा करण्यात यश आले. या टी-२० विश्वचषकात भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
शिवम दुबेने रिशाद हुसैनच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा षटकार ठोकला. पुढच्याच चेंडूवर दुबे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात क्लीन बोल्ड झाला. त्याने 24 चेंडूत 34 धावा केल्या. हार्दिक पांड्यानेही षटकार ठोकला, त्याने आता 18 चेंडूत 28 धावा केल्या आहेत. अक्षर पटेल 1 धाव घेतल्यानंतर पंड्यासोबत खेळत आहे.
https://twitter.com/cricxnews140982/status/1804545804138627288
शिवम दुबेला बाद करत रिशाद हुसेनने भारताला आणखी एक धक्का दिला. शिवम हार्दिक पंड्याबरोबर चांगली भागीदारी करत होता, पण रिशादच्या गोलंदाजीवर तो पाचवा फलंदाज म्हणून बाद झाला. शिवमने 24 चेंडूत 34 धावा केल्या.
https://twitter.com/cricfootadnan/status/1804542787041595440
तांझिम हसनने 17व्या षटकात 9 धावा दिल्या. शिवम दुबेने ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकला. षटकात एकूण 9 धावा आल्या. भारताने 17 षटक संपेपर्यंत 155 धावा केल्या आहेत.
मेहदी हसनने 15 व्या षटकात 14 धावा दिल्या. हार्दिक पंड्यानेही षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकला. 11 चेंडूत 18 धावा केल्यानंतर हार्दिक पांड्या आता क्रीजवर आहे आणि शिवम दुबे 14 चेंडूत 10 धावा केल्यानंतर क्रीजवर आहे. भारताने 15 षटकात 4 गडी गमावून 134 धावा केल्या आहेत.
यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला बाद करून रिशाद हुसेनने भारताला चौथा धक्का दिला. पंत शानदार फलंदाजी करत होता आणि सतत मोठे फटके खेळत होता, पण रिशादच्या चेंडूवर त्याची विकेट गेली. पंत २४ चेंडूत ३६ धावा करून बाद झाला.
https://twitter.com/itz_nikhil_2408/status/1804541461029097967
महमुदुल्लाहने 10व्या षटकात गोलंदाजी केली. 10 षटकांनंतर टीम इंडियाने 3 विकेट गमावून 83 धावा केल्या आहेत. ऋषभ पंत 15 चेंडूत 12 धावा तर शिवम दुबे 4 चेंडूत 2धावा करत खेळत आहे.
तांझिम भारतीय संघाला आणखी एक धक्का देत सूर्यकुमार यादवला स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कोहली बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज म्हणून क्रीझवर आलेल्या सूर्यकुमारने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, पण पुढच्याच चेंडूवर तो यष्टिरक्षकाच्या हाती झेलबाद झाला. सूर्यकुमारने दोन चेंडूत सहा धावा केल्या.
वेगवान गोलंदाज तनझिम हसन साकिबने शानदार फॉर्ममध्ये दिसत असलेल्या विराट कोहलीला गोलंदाजी करत भारताला दुसरा धक्का दिला. कोहली चांगली फलंदाजी करत होता, पण त्याची विकेट गमावली. कोहली 28 चेंडूत 1 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 37 धावा करून बाद झाला.
https://twitter.com/Kohligram_here/status/1804534910495203671
मुस्तफिजुर रहमान पहिले षटक टाकायला आला. रहमानच्या षटकात एका षटकारासह 11 धावा आल्या. 6 षटकांच्या अखेरीस टीम इंडियाची धावसंख्या एका विकेटवर 53 धावा होती. कोहली 27 आणि पंत 3 धावांसह खेळत आहे..
चौथ्या षटकात शाकिब अल हसनच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा बाद झाला. त्याचा झेल जाकर अलीने टिपला. रोहितने 11 चेंडूत 23 धावा केल्या. ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे.
भारत वि बांगलादेश सामन्याला सुरूवात झाली असून भारताने पहिल्याच षटकात चांगली सुरूवात केली. विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी मैदानात आहे.
फिरकीपटूने दुसरे षटकही टाकले. शकीब अल हसनच्या षटकात रोहित शर्माने चौकार आणि विराट कोहलीने जोरदार षटकार ठोकला. कोहलीने 6 चेंडूत 11 तर रोहितने 6 चेंडूत 12 धावा केल्या आहेत. 2 षटकांनंतर भारताची धावसंख्या 23 आहे.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
बांगलादेश : तांझीद हसन, लिटन दास, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), रिशाद हुसेन, ताहिद हृदय, शकिब अल हसन, महमुदुल्ला, मेहदी हसन, जेक अली, तांझीद हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान.
बांगलादेशचा कर्णधार नझमुल शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेश संघात तस्किन अहमदच्या जागी जाकेर अली प्लेइंग इलेव्हनमध्ये आला आहे. भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
https://twitter.com/DeepakK7314313/status/1804517746853519471
ऑस्ट्रेलिया-बांगलादेश सामन्यापूर्वी अँटिगा येथे झालेल्या टी-२० विश्वचषकात कमी धावसंख्येचे बरेच सामने झाले आहेत. येथे पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 100 पेक्षा कमी आहे आणि पहिल्या डावाची सरासरी विजयी धावसंख्या पाच विकेट्सवर 122 धावा होती. मात्र, भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड म्हणतात की, आमचा संघ खेळपट्ट्यांवर यापेक्षाही कमी सरासरीने खेळला आहे.
बांगलादेशला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर ८ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. आता जर संघ भारताविरुद्ध प्रभावी कामगिरी करू शकला नाही, तर त्यांच्यासाठी पुढील दरवाजे बंद होतील. बांगलादेशने ग्रुप स्टेजमध्ये श्रीलंका, नेपाळ आणि नेदरलँड्सचा पराभव करून सुपर ८ साठी पात्रता मिळवली होती. ग्रुप स्टेजमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून केवळ चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-२० मध्ये खूप जवळचे सामने झाले आहेत, त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा रोमांचक सामन्याची अपेक्षा आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. ग्रुप स्टेजनंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर एट सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत लक्ष्याचा बचाव करताना प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणण्यात यश मिळवले. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या देखील बुमराहला चांगली साथ देत आहेत, तर अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 विश्वचषकात प्रथमच प्लेइंग-11 मध्ये सामील झालेला मनगट फिरकी गोलंदाज कुलदीप यादवनेही प्रभावित केले.
https://twitter.com/khansalman88177/status/1804497692527313031
जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर एट टप्प्यातील पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली. उरलेल्या दोन सामन्यांमध्ये फारसे अंतर नाही, त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आपले स्टार खेळाडू फॉर्ममध्ये परततील अशी आशा असेल. विराट कोहली आणि रोहित आजपर्यंत संघाला दमदार सुरुवात करून देऊ शकलेले नाहीत. या दोन फलंदाजांनी अद्याप एकही मोठी खेळी साकारलेली नाही. रोहित आणि कोहली या स्पर्धेत मोठी खेळी खेळण्यासाठी उत्सुक असतील आणि पुढील आव्हान लक्षात घेता भारतीय सलामी जोडीला फॉर्ममध्ये परतण्याची चांगली संधी असेल.