टी-२० विश्वचषकाच्या चौथ्या सामन्यामध्ये भारतीय संघ अडचणीत आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना १८४ धावा केल्या. १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने पहिल्या सात षटकांमध्ये नाबाद ६६ धावांपर्यंत मजल मारली. अॅडलेडमध्ये पाऊस सुरु झाल्याने सामना थांबवण्यात आला. मात्र सामना थांबवण्यात आला त्या क्षणी डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार बांगलादेश हा निर्धारित धावसंख्येहून १७ धावा पुढे आहे. त्यामुळेच सामना पुन्हा सुरु झाला नाही तर बांगलादेशला विजयी घोषित केलं जाईल. बांगलादेशला पाऊस सुरु झाला तेव्हा बिनबाद ६६ धावांपर्यंत मजल मारण्यासाठी मोलाचे योगदान देणारा सलामीवीर लिटन दास याने अनोख्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
नक्की पाहा >> Ind vs Ban: बंगलादेशने दिनेश कार्तिकची विकेट ढापली? ‘थर्ड अंपायर आंधळा आहे का?’ चाहत्यांचा Video शेअर करत प्रश्न
पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा लिटन २६ चेंडूंवर नाबाद ५९ धावांवर खेळत आहे. लिटनने अवघ्या २१ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतकं साजरं केलं. आपल्या ५९ धावांच्या खेळीमध्ये दासने सात चौकार लगावले. तर तीन षटकारही लिटनने मारले. २२६ हून अधिकच्या सरासरीने लिटनने या धावा केल्या. पाऊस पडला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही तर आपण आघाडीवर असावं याच विचाराने बांगलादेशने तुफान फटकेबाजी करत धावगती वाढवल्याचं दिसून आलं. या खेळीमध्ये लिटनने दोन विक्रम केले. यापैकी एक विक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे तरी टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये पॉवरप्लेमध्येच अर्धशतक साजरा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.
नक्की वाचा >> World Cup: पुन्हा गंभीर v/s आफ्रिदी… यंदा कारण ठरला बाबर आझम; गंभीरच्या ‘स्वार्थी’ टीकेवर आफ्रिदी म्हणाला, “या स्पर्धेनंतर…”
लिटनने टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये पॉवरप्लेमध्येच अर्धशतक साजरं करण्याचा विक्रम केला. यापूर्वी अशी कामगिरी दोनच खेळाडूंनी केली आहे. स्टीफन मायबर्गने आयर्लंडविरुद्ध २०१४ साली आणि के. एल. राहुललने स्कॉटलंडविरोधात दुबईमध्ये असा विक्रम केला होता.
नक्की वाचा >> Ind vs Ban: …अन् त्या शॉटबरोबरच विराटने अनोखा विश्वविक्रम आपल्या नावावर केला; यापूर्वी कोणालाही जमली नाही ही कामगिरी
तर संघाच्या आणि स्वत:च्याही ५० धावा पूर्ण करण्याचा योगही लिटनच्या खेळीदरम्यान जुळून आला. कोणत्याही टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ ठरली. त्यामुळेच लिटन हा संघाच्या आणि स्वत:च्या ५० धावा एकाच वेळी पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला.
एवढचं नाही तर २१ व्या चेंडूंवर अर्धशतक साजरं करत लिटनने सर्वात वेगवान अर्धशतक साजरं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी मजल मारली आहे. सर्वात वेगाने अर्धशतक साजरं करणाऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉनिस पहिल्या स्थानी आहे.
लिटनच्या या खेळीमुळे बांगलादेश पाऊस आला तेव्हा भक्कम स्थितीमध्ये आहे. तुफान फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजीची पिसं काढली. सात चौकार आणि तीन षटकांरांचा विचार केल्यास लिटनने दहा चेंडूंमध्ये ४६ धावा केल्या.