भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिल्यानंतर भारतीय संघाने या सामन्यात १८४ धावांपर्यंत मजल मारली आहे. शेजारी देश असलेल्या बांगलादेशसमोर १८४ धावांचं आव्हान भारताने ठेवलं असून या सामन्यामध्ये के. एल. राहुलला लय गवसल्याचं दिसून आलं. विराट कोहलीनेही सुरेख फलंदाजी केली. मात्र या सामन्यामध्ये भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला धावबाद देण्याच्या निर्णयावरुन अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तिसरे पंच आंधळे आहेत का? तिसरे पंच डोळ्यांवर पट्टी बांधून निर्णय देतात का असे प्रश्न अनेकांनी कार्तिकला बाद घोषित करण्यावरुन उपस्थित केले आहेत.
नक्की वाचा >> Ind vs Ban: …अन् त्या शॉटबरोबरच विराटने अनोखा विश्वविक्रम आपल्या नावावर केला; यापूर्वी कोणालाही जमली नाही ही कामगिरी
झालं असं की, १७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाचा धावफलक १५० वर असताना कार्तिक धावबाद झाला. पण कार्तिकला धावबाद करताना चेंडूऐवजी हातानेच गोलंदाजाने यष्ट्या उडवल्या. गोलंदाज शोरफूल अहमदने आधी यष्ट्यांना हात लावला आणि यष्ट्यांवरील बेल्स पडल्या. चेंडू आणि यष्ट्यांमध्ये स्पष्टपणे अंतर असल्याचं अनेकांनी स्क्रीनशॉट शेअर करत म्हटलं आहे.
नक्की वाचा >> World Cup: पुन्हा गंभीर v/s आफ्रिदी… यंदा कारण ठरला बाबर आझम; गंभीरच्या ‘स्वार्थी’ टीकेवर आफ्रिदी म्हणाला, “या स्पर्धेनंतर…”
तुम्हीच पाहा हा व्हायरल झालेला व्हिडीओ…
यावर चाहत्यांनी काय म्हटलं आहे पाहा…
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
नक्की वाचा >> IND vs BAN T20 World Cup: …तर भारताचा उपांत्यफेरीतील प्रवेश कठीण; पाकिस्तानला लागणार पात्रतेची लॉटरी
यापूर्वीही टी-२० विश्वचषकाच्या सामन्यामध्ये पंचांनी दिलेल्या निर्णयावरुन वाद झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलला धावबाद देण्याच्या निर्णयावरुनही वाद झाला होता.