Ind Vs Ban Throw ball specialist Raghu Cleans Shoes Of Indian Players: भारत विरुद्ध बांगलादेशदरम्यान बुधवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेमधील सुपर १२ फेरीतील सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. या फेरीतील ३५ व्या सामन्यामध्ये भारताने डकवर्थ-लुईस-स्टेन नियमानुसार पाच धावांनी बांगलादेशला पराभूत केलं. मात्र या सामन्यातील खेळाडूंच्या कामगिरीसोबत आणखीन एका व्यक्तीची सोशल मीडियावर चर्चा आहे. ही व्यक्ती हातात बूट घेऊन उभी असल्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तसेच या व्यक्तीवर कौतुकाचा वर्षावही होताना दिसत आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण: भारताने बांगलादेशविरुद्ध विजय कसा खेचून आणला? उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघातील सपोर्टींग स्टाफ वापरतो तशा कपड्यांमध्ये दिसणारी व्हायरल फोटोमधील ही व्यक्ती आहे डी. रघुवेंद्र. भारतीय क्रिकेट संघामध्ये रघू नावाने लोकप्रिय असलेले रघुवेंद्र हे भारत बांगलादेश सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंच्या बूटांमध्ये अडकलेला चिखल काढताना दिसले. विशेष म्हणजे हे असं करण्यामधील कारण वाचून तुम्हालाही नक्कीच या व्यक्तीच्या कामाचं कौतुक तर वाटेल पण कोणतंही काम हे कमी दर्जाचं नसतं हे सुद्धा प्राकर्षाने जाणवेल. भारत आणि बांगलादेश सामन्यादरम्यान भारताने प्रथम फलंदाजी करुन १८४ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर बांगलादेशचा संघ आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. मात्र दुसऱ्या डावातील सात षटकांनंतर पाऊस सुरु झाला आणि सामना थांबवावा लागला.

नक्की पाहा >> Ind vs Ban: बांगलादेशने दिनेश कार्तिकची विकेट ढापली? ‘थर्ड अंपायर आंधळा आहे का?’ चाहत्यांचा Video शेअर करत प्रश्न

जवळजवळ अर्धा तास पावसाची संततधार पडल्यानंतर पाऊस थांबला. त्यानंतर पुन्हा सामना सुरु करण्याचा निर्णय पंचांनी दोन्ही कर्णधारांबरोबर चर्चा केल्यानंतर घेतल्या. मात्र मैदान ओलं असल्याने भारतीय खेळाडू मैदानात क्षेत्ररक्षणासाठी आले. मैदानावरील खेळपट्टी आणि आजूबाजूच्या भागावर कव्हर असल्याने तो भाग सुखा होता. मात्र मैदानावरील ३० फूटांच्या सर्कल बाहेरील भाग ओलाच होता. त्यामुळेच क्षेत्ररक्षण करताना भारतीय खेळाडू घसरुन पडण्याची आणि जखमी होण्याची शक्यता होती.

नक्की पाहा >> Ind vs Ban: के. एल. राहुलचा हा थ्रो ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट; Rain Break नंतर दुसऱ्याच चेंडूवर काय घडलं पाहा Video

ओल्या मैदानामध्ये धावताना आणि क्षेत्ररक्षण करताना चिखल बुटांना लागतो आणि त्यांची जमीनीवरील पकड निसटते. त्यामुळेच भारतीय खेळाडू घसरुन पडू नयेत म्हणून रघू हे सामना सुरु असताना सीमारेषेजवळ ब्रश घेऊन फिरत होते. एक एक धाव महत्त्वाची असताना क्षेत्ररक्षणामध्ये गल्लत होऊन त्याचा फटका भारतीय संघाला बसू नये म्हणून रघू हे आपल्यापरीने या अनोख्या माध्यमातून मदत करत होते. अनेक खेळाडूंचे बूट त्यांनी साफ करुन दिले. रघू यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

१)

२)

३)

४)

५)

रघू हे भारतीय संघासाठी साईड आर्म थ्रोअर म्हणजेच क्षेत्ररक्षणासंदर्भातील प्रशिक्षण घेणाऱ्या टीमचे सदस्य म्हणून काम करतात. भारतीय खेळाडूंच्या काळजीपोटी आपली जबाबदारी म्हणून त्यांनी स्वत:हून हाती ब्रश घेऊन बांगलादेशविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात केलेली ही मदत अनेक क्रिकेट चाहत्यांना फारच आवडल्याचं वरील पोस्ट्सवरुन स्पष्ट होत आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban throw ball specialist raghu cleans shoes of indian players to prevent them from slipping scsg