बांगलादेशी क्रिकेटर नुरुल इस्लामने भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान विराट कोहलीवर खोट्या क्षेत्ररक्षणाचा आरोप केला होता, त्यानंतर विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खोट्या क्षेत्ररक्षणासाठी (Fake Fielding) विराट कोहली खरोखरच दोषी होता का आणि भारताला खरोखरच पाच धावांचा दंड ठोठावायला हवा होता का, अशी चर्चा सतत होत आहे. याबाबत ट्विटरवर वाद सुरू झाला असून आता टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आकाश चोप्राने यावर आपले मत मांडले आहे.

आकाश चोप्राने ट्विटरवर लिहिले, ”क्षेत्ररक्षण खरोखरच खोटे होते का?’ यावर एका ट्विटर युजरने लिहिले की, हो झालं, पण नियमांनुसार पहिल्यांदा क्षेत्ररक्षकाला इशारा दिला जातो आणि दुसऱ्यांदा फक्त विरोधी संघाला पाच धावा मिळतात.”

thane i am kabaddi player not a cricketer bachu kadu said he will re enter after comeback
माझी पुन्हा एन्ट्री होणार, बच्चू कडूंचे वक्तव्य, माझ्यावर कारवाईमुळे विरोधकांना फार लाभ होणार नाही
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Virat Kohli Shakes Hand with Ball Boy in IND vs ENG Cuttack ODI Boy Left Awestruck Video Viral
IND vs ENG: विराटच्या कृतीने बॉल बॉय झाला अवाक्, सीमारेषेजवळ कोहलीने असं काही केलं की… VIDEO होतोय व्हायरल
विराटच्या अनुपलब्धतेमुळे संधी!श्रेयस अय्यरची प्रतिक्रिया; पहिल्या सामन्यातील निर्णायक खेळीबाबत समाधानी
Kohli misses Nagpur ODI due to right knee injury
कोहलीच्या गुडघ्याला दुखापत; इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्याला मुकला
Rohit Sharma Gives Update on Virat Kohli Knee Injury on Toss of IND vs ENG 1st ODI
IND vs ENG: विराट कोहली पहिल्या वनडेत का नाही? रोहित शर्माने दिले अपडेट
Champions Trophy 2025 Suresh Raina Prediction For Player of the Tournament prefers Shubman Gill
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सुरेश रैनाचं मोठं भाकीत! विराट-रोहित नव्हे तर ‘हा’ खेळाडू ठरणार स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
Who Is Himanshu Sangwan He Clean Bowled Virat Kohli on Ranji Trophy Return
Ranji Trophy: विराट कोहलीला क्लीन बोल्ड करणारा हिमांशू सांगवान आहे तरी कोण? सेहवागचा आहे शेजारी

या ट्विटर यूजरला उत्तर देताना आकाश चोप्राने लिहिले की, ”हे योग्य नाही. हे पंचांवर अवलंबून आहे की ते हे खोटे क्षेत्ररक्षण आहे असे मानतात का? आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पाच धावांचा दंड ठोठावतात आणि मग तो चेंडू डेड बॉल घोषित केला जातो. प्रथमच असे केल्याने शिक्षा होते, आयसीसीच्या नियमात कुठेही असे लिहिलेले नाही की प्रथम ताकीद दिली जाते आणि त्यानंतरच शिक्षा दिली जाते.”

नेमकं काय झालं?

नुरुल ज्या क्षणाचा उल्लेख करत आहे, तेव्हा सातवं षटक टाकलं जात होतं. अर्शदीपने गोलंदाजाकडे चेंडू फेकलेला असताना विराट कोहलीने आपल्या हातात चेंडू आला असून फेकत असल्याचं खोटं नाटक केलं होतं. यावेळी लिट्टन आणि नजमूल मैदानात होते. त्यांनी यावेळी कोहलीकडे पाहिलंदेखील नव्हतं. त्यामुळे नुरुलच्या आरोपांनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : बांगलादेशविरुद्ध अर्धशतक ठोकल्यानंतर केएल राहुलने केला खुलासा, नेटमध्ये विराट कोहलीशी काय झाली होती चर्चा

आयसीसीचा नियम काय सांगतो?

आयसीसीचा नियम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जाणूनबुजून लक्ष विचलित करणं, फसवणूक करणं किंवा फलंदाजाला अडथळा करण्यापासून प्रतिबंधित करतो. जर पंचांना असं झाल्याचं आढळलं तर ते डेड बॉल जाहीर करु शकतात किंवा पाच पेनाल्टी धावा देऊ शकतात.

Story img Loader