टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये, गुरुवारी भारत आणि इंग्लंड संघात दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्याला गुरुवारी दुपारी १:३० वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यापूर्वी बुधवारी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली. यादरम्यान त्याने त्याच्या दुखापतीबाबत आणि संघाच्या तयारीबद्दल अपडेटही दिले. यासोबतच त्याने ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरही दिले.
२००७ मध्ये भारताने टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्याला आता नऊ वर्षे झाली आणि देशाने कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकली. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. अशा स्थितीत मेन इन ब्लूला जेतेपद पटकावण्याची चांगली संधी आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान रोहितने उपांत्य फेरी गाठण्याबाबत सांगितले की, “आमच्यासाठी ही चांगली संधी आहे. ही एक लांब प्रक्रिया आहे आणि आम्हाला ती टिकवून ठेवायची आहे. आम्हाला चांगले क्रिकेट खेळायचे आहे.” दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाबाबत तो म्हणाला, “आम्ही ज्या प्रकारे खेळलो त्याचा आम्हाला अभिमान वाटू शकतो. दोन चांगले संघ बाद झाले आहेत. आपल्याला चांगले करावे लागेल. एक वाईट सामना तुम्हाला परिभाषित करू शकत नाही.”
अॅडलेडच्या मैदानावर रोहित शर्मा म्हणाला –
अॅडलेडमधील सामन्याबाबत तो म्हणाला, “गेल्या वर्षी दुबईच्या मैदानात फारसा बदल झाला नाही. येथील (ऑस्ट्रेलियातील) काही मैदानांना लहान सीमा आहेत, काहींना नाही. हे एक आव्हान आहे. आम्ही परिस्थितीशी चांगले जुळवून घेतले आहे. मेलबर्न हे मोठे मैदान होते. अॅडलेडमध्ये आमच्याकडे पूर्णपणे भिन्न परिस्थिती आहेत आणि आम्हाला माहित आहे की येथे कोणत्या प्रकारचे नियोजन आवश्यक आहे.”
रोहित शर्माने दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतवर केले भाष्य –
दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्याबद्दल रोहित म्हणाला, “गेल्या सामन्यातही डीके आणि पंतबद्दल, मी म्हणालो होतो की पर्थमध्ये खेळले गेलेले दोन सामने वगळता पंत हा एकमेव खेळाडू आहे. ज्याला या दौऱ्यावर खेळण्याची संधी मिळाली नाही. तो अनौपचारिक सराव सामना खेळला होता, परंतु तेव्हापासून त्यांला खेळण्याची संधी मिळाली नाही. आम्हाला त्यांला खेळण्यासाठी वेळ द्यायचा आहे आणि गरज पडल्यास उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत बदल करण्याचा पर्यायही आम्हाला हवा आहे. एखाद्या खेळाडूला सरळ खेळण्याची संधी देणे योग्य होणार नाही. आम्ही सर्वांना तयार राहण्यास सांगितले आहे. आम्हाला झिम्बाब्वेविरुद्ध डावखुऱ्या खेळाडूला संधी द्यायची होती. उद्या काय होईल, मी आत्ताच सांगू शकत नाही.”