IND vs ENG Rohit Sharma Tells Why India Lost: टी २० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात आज टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी ८० व ८६ धावांवर नाबाद राहून १० गडी राखून टीम इंडियाला पराभूत केले आहे. या लाजिरवाण्या पराभवावरून भारतीय संघावर टीका होत असताना कर्णधार रोहित शर्मा याने थोडक्यात आजच्या खेळावर स्पष्टीकरण दिले आहे. रोहित शर्माने आजच्या खेळात आपल्यासहीत संघाला ताण नीट हाताळता आला नाही त्यामुळेच खेळावर परिणाम झाल्याचे सांगितले आहे.
रोहित शर्मा म्हणाला की, “तुम्ही जाऊन लोकांना दडपण कसे हाताळायचे हे शिकवू शकत नाही. संघातील बरेच लोक आयपीएलमध्ये दडपणाखाली खेळतात आणि त्यापैकी काही ते हाताळू शकतात. जेव्हा बाद फेरीचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही मन किती शांत ठेवून खेळू शकता हे पाहणे महत्त्वाचे असते.”
रोहितने पुढे आजच्या सामन्यातील चुकांवर स्पष्टीकरण देत सांगितले की, “आजच्या सामन्यात भारताची गोलंदाजांची फळी कमकुवत ठरली आणि हाच दोन्ही संघांमधील मुख्य फरक ठरला. फलंदाजीतही चुका झाल्याचं पण भारताने उभे केलेले टार्गेट इतकेही वाईट नव्हते मात्र गोलंदाजीत संघ पूर्ण फसला. ज्या प्रकारे गोलंदाजीची सुरुवात झाली तेव्हाच आम्ही थोडे घाबरलो होतो. भुवीला सामन्यात कुठेतरी विकेट घेता येईल अशी आमची इच्छा होती. अॅडलेडच्या मैदानात कुठे धावा घेता येतात हे आम्हाला माहीत होते, आम्ही त्याबद्दल बोललो, पण तसे झाले नाही.”
IND vs ENG: मोहम्मद शमीचा नको ‘तो’ स्टंट नडला; रोहित शर्मा भरमैदानातच.. पाहा Video
दरम्यान, आजच्या सामन्यानंतर पाकिस्तानसह आता इंग्लंड विश्वचषक अंतिम सामना खेळणार हे निश्चित झाले आहे. रविवारी, १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.