क्रिकेट, राजकारण आणि सिनेमा या तीन गोष्टी भारतीयांचा जीव की प्राण आहे असं म्हटलं जातं. या तिन्ही गोष्टींसंदर्भात भारतीय कितीही वेळ, कुठेही गप्पा मारु शकतात. त्यातही या तीन गोष्टींपैकी दोघांचा मेळ जुळून आला तर विचारायलाच नको अशी परिस्थिती आहे. सध्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर असाच एक योग जुळून आला असून ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक हे नेमके कोणत्या बाजूने आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
भारतीय वंशाचे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान ठरलेल्या सुनक यांना इंग्लंड जिंकावं असं वाटतंय की भारताने पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळावं असं वाटतंय? सुनक हे भारताच्या बाजूने असतील की इंग्लंडच्या? त्यांचा फार गोंधळ उडाला असे का? ते मानाने भारताच्या बाजूने असावेत का? हे आणि असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले असून ते छोटे व्हिडीओ, मिम्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत.
१) सुनक यांचं नक्कीच असं काहीतरी होणार म्हणे…
२) सर्वाधिक गोंधळात असलेली व्यक्ती
३) कोणाचं काय तर कोणाचं काय
४) यांचा पाठिंबा कोणाला?
५) भारताने इंग्लंडचा पराभव केल्यानंतर असं होईल
६) यांचं तर म्हणणं जय शाहांशी बोलले
७) यांनी तर जय शाहांच्या बाबांनाच मध्ये आणलं
८) निकालानंतरची तुलना
९) सध्या ब्रिटीश पंतप्रधान
१०) तुमच्याच बाजूने…
भारत विरुद्ध इंग्लंडची आकडेवारी काय सांगते? कोणाचं पारडं जड?
भारत आणि इंग्लंडच्या संघांदरम्यान टी-२० चे २२ सामने झाले असून त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक सामने भारताने जिंकले आहेत. इंग्लंड आणि भारतादरम्यान झालेल्या तीन टी-२० विश्वचषक सामन्यांपैकी एकामध्ये इंग्लडने विजय मिळवला असून भारताने दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता या वर्षीच्या टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीमध्ये भारत आपलं वर्चस्व कायम राखणार की इंग्लंड भारताला धक्का देणार हे या आठवड्यात स्पष्ट होईल. जो संघ हा सामना जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल.