टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये इंग्लंडच्या संघाने भारतावर मोठा विजय मिळवला. दहा गडी राहून इंग्लंडच्या संघाने अंतिम फेरीमध्ये मोठ्या थाटात प्रवेश केला. आधी विराट कोहली (५०) आणि हार्दिक पंड्या (६६) वगळता सर्वच भारतीय फलंदाज अपयशी ठरल्याने आणि नंतर सुमार गोलंदाजीमुळे भारत लाजिरवाण्या पराभवासहीत स्पर्धेतून बाहेर पडला. या विजयामुळे आता १३ तारखेला इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना होणार असून त्यामधून नवा विजेता मिळणार आहे. उपांत्य फेरीतील भारताच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने खोचक पद्धतीने टीका केली आहे.
नक्की वाचा >> Ind vs Eng: २८ चेंडूंमध्ये २७ धावा! ‘टी-२० मध्ये कसोटी खेळणाऱ्या रोहितचं अभिनंदन’; ‘हिटमॅन’च टार्गेटवर, चाहत्यांना संताप अनावर
भारतीय गोलंदाजांना एकही गडी बाद करता आला नाही. जॉस बटलर नाबाद ८० आणि अॅलेक्स हेल्स नाबाद ८६ धावांच्या जोरावर बिनबाद १७० असा धावफलक ठेवत इंग्लंडने सामना जिंकला. त्यामुळेच सामना संपायच्या काही मिनिटं आधीच शोएब अख्तरने खोचक पद्धतीने एक ट्वीट केलं. यामध्ये त्याने एक इमोजीही वापरला. भावांनो एकही विकेट घेणार नाही का? असा प्रश्न अख्तरने विचारला.
नक्की वाचा >> Ind vs Eng: “केएल राहुल म्हणजे सर्वात मोठा Fraud, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये धावा काढत नाही आणि संघाला…”
सामना संपल्यानंतरही अख्तरनं एक ट्वीट केलं. यामध्ये त्याने इंग्लंडचा स्कोअर पोस्ट करत भारताबद्दल सहानुभूती व्यक्त केली. “बिनबाद १७०… हा आकडा पुढील बराच काळ (भारतीय संघाला) त्रास देत राहणार. भारतासाठी फार कठीण सामना ठरला,” असं अख्तरने म्हटलं आहे.
नक्की पाहा >> Ind vs Eng: चौकार गेला तरी हार्दिक पंड्या Out झाला! शेवटच्या चेंडूवरील ड्रामा पाहून पत्नी नताशाही गोंधळली; Video होतोय Viral
टी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या स्पर्धांमध्ये भारताच्या सर्वात लाजिरवाण्या पराभवांपैकी हा एक असल्याची चर्चा सोशल मीडियावरही सुरु झाली आहे.