Shaheen Afridi Signs Indian Flag: टी २० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी ८० व ८६ धावांवर नाबाद राहून १० गडी राखून टीम इंडियाला पराभूत केले आहे. तर दुसरीकडे संपूर्ण विश्वचषकात पॉईंट टेबलच्या तळाला असणारी पाकिस्तानी बाबर अँड कंपनी अंतिम सामन्यात पोहोचली आहे. टी २० विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने न्यूझीलंडचा सहज पराभव केला आणि अंतिम सामन्यात धडक दिली. या दमदार विजयानंतर पाकिस्तानात जल्लोष पाहायला मिळाला, स्टेडियम मध्येही पाकिस्तानी खेळाडूंनी तर टीव्हीवरील चर्चा सत्रात माजी खेळाडूंनी नाचून आनंद साजरा केला. यावेळी पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने केलेल्या एका कृतीवरून वाद सुरु झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर, एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये पाकिस्तानी स्टार शाहीन आफ्रिदी सिडनीमध्ये एका चाहत्यासाठी भारतीय ध्वजावर स्वाक्षरी करताना दिसत आहे. शाहीनने यापूर्वी पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती जिथे त्याने 24 धावांत 2 विकेट घेतल्या होत्या. फिन ऍलनची सुरुवातीची विकेट आणि कर्णधार केन विल्यमसनची महत्त्वपूर्ण विकेट घेत त्याने न्यूझीलंडची धावांची घोडदौड वेळीच रोखली होती.

शाहीनचा भारतीय ध्वजावर सही करतानाचा फोटो व्हायरल होताच अनेकांना पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची आठवण झाली. यापूर्वी 2018 मध्ये स्वित्झर्लंडमधील सेंट मॉरिट्झ आईस क्रिकेट स्पर्धेदरम्यान शाहीद आफ्रिदीने सुद्धा अशाच प्रकारे भारताच्या ध्वजासह पोज दिली होती. आता होणाऱ्या सासरेबुवांप्रमाणे शाहीन आफ्रिदीने सुद्धा भारतीय ध्वजावर सही केली आहे. यानंतर ट्विटरवर अनेकांनी आफ्रिदीचे कौतुक केले मात्र मुळात अशा प्रकारे ध्वजावर सही करणे किंवा काहीही लिहिणे हा एक दंडनीय गुन्हा आहे. काही भारतीयांनी आफ्रिदीला या नियमांची आठवणही करून दिली आहे

शाहीन आफ्रिदीने केली भारतीय राष्ट्रध्वजावर सही

IND vs ENG: तुम्ही कुणाला शिकवू शकत नाही..भारताच्या पराभवावर रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं ‘हे’ कारण

भारतीय ध्वजावर सही करण्यावरून टीका सुरु होताच आफ्रिदीने “आपण राष्ट्रध्वजांचा आदर केला पाहिजे आणि म्हणूनच मी त्यांना त्यांचा ध्वज योग्य प्रकारे धरण्यास सांगितले, होते असे स्पष्टीकरणही पाकिस्तानी मीडियाला दिले आहे.


दरम्यान, भारताच्या इंग्लंडसमोरील प्रभावांनंतर आता टी २० विश्वचषकाची अंतिम फेरी ही पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड अशी रंगणार आहे. १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा अंतिम सामना पार पडणार आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng shaheen afridi signs on indian flag after entering t20 world cup finals netizens trolling pak cricketers svs
Show comments