India vs England 2nd Semi, T20 World Cup 2022 Weather Updates: टी२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत इंग्लंडची टक्कर भारताशी होणार आहे. पहिला उपांत्य सामना जिंकून पाकिस्तान अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. आता पाकचा मुकाबला १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. त्याआधी आज ऐतिहासिक ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा उपांत्य फेरीतील सामना रंगणार आहे.

पहिले तर भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य सामना भारताच्या प्रमाणवेळेनुसार दुपारी एक वाजून ३० मिनिटांनी खेळला जाणार आहे. त्याच्या ३० मिनिटांअगोदर नाणेफेक होईल. ही नाणेफेक जो गमावणार तो संघ जिंकणार असे समीकरण मागील ११ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांपासून या मैदानावर दिसले आहे. भारताने या मेदानावर दोन टी२० सामने खेळले. या दोन्ही सामन्यात विराटने नाबाद ९० आणि नाबाद ६४ धावा केल्या होत्या. भारताने नाणेफेक गमावून दोन्ही सामने जिंकले होते. इंग्लंडनेही या मैदानावर २०११ टी२० सामना खेळला होता. तो या मैदानावरील पहिलाच सामना होता आणि इंग्लंडने यजमान संघाचा एक विकेटने पराभव केला होता.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

ॲडलेडमध्ये पावसाची शक्यता नाही

१० नोव्हेंबरला भारत आणि इंग्लंड सामन्यादरम्यान ॲडलेड ओव्हलवर पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मात्र, सामन्याच्या दिवशी ॲडलेडमध्ये ढगाळ वातावरण असेल. याआधी भारत आणि बांगलादेश यांच्यात सुपर-१२ ग्रुप २ मध्ये सामना झाला होता. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता, त्यामुळे सामन्यातील षटक १४ षटकांची करण्यात आली होती. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना ॲडलेड ओव्हलवर खेळला गेला. त्यानंतर उपांत्य फेरीच्या वेळीही पावसामुळे सामन्याची मजा लुटणार की काय, अशी भीती चाहत्यांना लागली होती. पण आता हवामान खात्याने चाहत्यांना खुशखबर दिली असून सामन्यात पावसाचा कोणताही अंदाज नसल्याचे सांगितले आहे.

१० नोव्हेंबरला टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना ॲडलेडमध्ये होणार आहे. पावसाची शक्यता पाहता दोन्ही सामन्यांमध्ये राखीव दिवस असतील. म्हणजेच पावसामुळे नियोजित दिवशी सामन्याचा निकाल लागला नाही तर दुसऱ्या दिवशी सामना पूर्ण होऊ शकतो.

हेही वाचा :  India vs England 2nd Semifinal: कोणत्या खेळाडूंवर भिस्त? चहल खेळणार? किती वाजता सुरु होणार सामना? Live कुठे पाहता येणार? 

पिच रिपोर्ट

ॲडलेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सूर्य चांगलाच तळपत आहे आणि उपांत्य फेरीच्या दिवशी सकाळी पावसाची शक्यता आहे, मात्र सामन्याच्या वेळी हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज सर्वाधिक आहे. या स्पर्धेसाठी गेल्या आठवड्यात तीन वेगवेगळ्या खेळपट्ट्या वापरल्या गेल्या आहेत. त्यातील न्यूझीलंड-आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामन्यासाठी ज्या खेळपट्ट्या वापरल्या गेल्या त्यावरच उपांत्य सामना होण्याची अपेक्षा आहे.

Story img Loader