भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी टी-२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. हा सामना अॅडलेड क्रिकेट मैदानावर दुपारी १:३० वाजता सुरुवात होणार आहे. बुधवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान संघाने न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव केला. पाकिस्तानचा संघ २००९ नंतर प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला. अशा परिस्थितीत टीम इंडिया २०१४ नंतर प्रथमच अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी उतरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१४ मध्ये भारतीय संघाला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना अॅडलेड ओव्हलवर होणार आहे. भारताने या मैदानावर आतापर्यंत दोन टी-२० सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. २०१६ मध्ये भारताने येथे ऑस्ट्रेलियाचा ३७ धावांनी पराभव केला होता. त्याचवेळी या विश्वचषकात बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केला.

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारत आणि इंग्लंड २२ वेळा आमनेसामने –

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारत आणि इंग्लंड २२ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने १२ सामने जिंकले, तर इंग्लंडच्या संघाने १० सामने जिंकले आहेत. भारत आणि इंग्लंड संघ १९८७ नंतर (३५ वर्षांनंतर) प्रथमच जागतिक (वनडे/टी-२०) उपांत्य फेरीत भिडतील. दोन्ही संघ प्रथमच टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भिडत आहेत. त्याच वेळी, दोन्ही संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दोनदा (१९८३ आणि १९८७) आमनेसामने आले आहेत. एक सामना भारताने तर एक सामना इंग्लंडने जिंकला होता.

टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ तीनदा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारताने दोन सामने जिंकले, तर एका सामन्यात इंग्लंडचा संघ विजयी झाला. यावेळी दोन्ही संघ तटस्थ ठिकाणी आमनेसामने आहेत. भारत आणि इंग्लंड दोनदा तटस्थ मैदानावर आमनेसामने आले आहेत. यापैकी टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले आहेत.

२०२२ या वर्षातील दोन्ही संघांची टी-२० मधील कामगिरी –

या वर्षीच्या टी-२० मधील दोन्ही संघांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले, तर भारताने यावर्षी (२०२२) या फॉरमॅटमध्ये ३७ सामने खेळले आहेत. यापैकी टीम इंडियाने २७ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर भारतीय संघ ९ सामन्यांत पराभूत झाला आहे. १ सामना अनिर्णित आहे. इंग्लंडबद्दल बोलायचे झाले तर, या वर्षी २५ टी-२० सामने खेळले आहेत आणि १३ जिंकले आहेत. इंग्लिश संघाला ११ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. १ सामना अनिर्णित राहिला आहे.

यावर्षी भारत आणि इंग्लंड संघ तीन टी-२० सामन्यात आमनेसामने आले आहेत. भारताच्या इंग्लंड दौऱ्यात तिन्ही टी-२० सामने खेळले गेले. भारताने ही मालिका २-१ ने जिंकली. म्हणजेच भारताने दोन सामने जिंकले आणि इंग्लंडने एक सामना जिंकला.

कोणत्याही विश्वचषकात (वनडे + टी-२०), दोन्ही संघ एकूण ११ वेळा आमनेसामने आले आहेत. यातून दोघांमध्ये काट्याची टक्कर पाहिला मिळाली आहे. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत राहिला आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये आठ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ३ सामने भारताने तर ४ सामने इंग्लंडने जिंकले. २०११ च्या विश्वचषकात दोघांमधील सामना बरोबरीत सुटला होता.

हेही वाचा – IND vs ENG 2nd Semifinal : रोहित शर्माने सांगितले कार्तिक आणि पंतमध्ये कोणाला मिळणार संधी? घ्या जाणून

टी-२० विश्वचषक २०२२ मधील दोन्ही संघांची कामगिरी –

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी या विश्वचषकात आतापर्यंत प्रत्येकी पाच सामने खेळले आहेत. जिथे टीम इंडियाने चार सामने जिंकले आणि एकात पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघ आठ गुणांसह गट २ मध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर इंग्लंडच्या संघाला पाचपैकी तीन सामने जिंकता आले. आयर्लंडविरुद्ध संघाला अपसेटला सामोरे जावे लागले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng t20 world cup check india vs england head to head record ahead of semi final clash vbm
Show comments