टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वसीम जाफर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांच्यात ट्विटरवरचे युद्ध काही नवीन नाही. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ चा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जात असताना, ट्विटरवर दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मार्क वुड दुखापतीमुळे या सामन्यात सहभागी होणार नाही. अशा स्थितीत वॉनने ट्विटरवर लिहिले की, आता भारत फेव्हरेट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वॉनने ट्विटरवर लिहिले की, ‘इंग्लंडला मोठा धक्का… वुड फिट नाही. भारत आता फेव्हरेट आहे….’ यावर जाफरने क्षणाचाही विलंब न लावता कमेंट करत लिहिले, ‘हॅलो ऋषी सुनक! पुढील काही तासांसाठी यॉर्कशायरमध्ये मोबाईल सिग्नल जॅमर बसवले जावेत, मला वाटते भारताकडून सदिच्छा म्हणून याकडे पाहिले जाईल. धन्यवाद.’

सामन्याबद्दल बोलायचे तर, टी-२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी अॅडलेडमध्ये खेळवला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने इंग्लंडसमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. टीम इंडियाने २० षटकात ६ विकेट गमावत १६८ धावा केल्या. भारतीय संघाकडून विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने महत्वाचे योगदान दिले. या दोघांनी अर्धशतक झळकावले. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना क्रिस जॉर्डन सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर क्रिस वोक्सने १ विकेट घेतली.

हेही वाचा – IND vs ENG 2nd Semifinal: अर्धशतकाबरोबरच विराटने स्वत:च्या नावे केला ‘हा’ विक्रम

मार्क वुड आणि डेव्हिड मलान दुखापतींमुळे उपांत्य फेरीतून बाहेर आहेत. या दोघांच्या जागी ख्रिस जॉर्डन आणि फिलिप सॉल्टची निवड करण्यात आली आहे. भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. या सामन्यात दिनेश कार्तिकऐवजी ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत पाकिस्तान आधीच पोहोचला आहे. तसेत आजचा सामना जिंकणारा संघ १३ नोव्हेंबरला अंतिम फेरीत पाकिस्तानशी भिडणार आहे.