T20 World Cup 2022 India vs Netherlands Time, Venue, Team Squad: टी२० विश्वचषक २०२२ मध्ये पावसाने आतापर्यंत अनेक संघांचा खेळ खराब केला आहे. आता भारत आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यातही पाऊस अडथळा ठरू शकतो. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होता आणि या सामन्यादरम्यानही पावसाची शक्यता होती. तथापि, मेलबर्नचे हवामान सामन्यापूर्वी स्वच्छ झाले आणि पूर्ण ४० षटकांचा सामना पाहिला. या सामन्यात टीम इंडिया बहुतांश वेळा पिछाडीवर होती, पण शेवटी विजय मिळवला. मात्र, दुसऱ्या सामन्यात पावसामुळे भारताचा खेळ खराब होऊ शकतो.

टी२० विश्वचषकात भारताचा दुसरा सामना नेदरलँड्सविरुद्ध असून टीम इंडियाचा विजय निश्चित मानला जात आहे. हा सामना जिंकल्यानंतर भारताचे दोन गुण होतील आणि चार गुणांसह टीम इंडिया आपल्या गटात अव्वल स्थानावर पोहोचेल. मात्र, पावसामुळे सामना रद्द झाल्यास भारताला एक गुण गमवावा लागू शकतो आणि भारतीय संघाला एका गुणावर समाधान मानावे लागू शकते. डकवर्थ लुईस नियमानुसार जर सामन्याचा निकाल लागला तर इंग्लंडप्रमाणेच भारतही सामना गमावू शकतो.

Ball tampering by India A players during the match against Australia A test match sports
भारत ‘अ’ संघावर चेंडूशी छेडछाड केल्याचे आरोप!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
IND A vs AUS A Ishan Kishan in Trouble as India A team accused of ball tampering
IND A vs AUS A : धक्कादायक! ऑस्ट्रेलियात टीम इंडियावर ‘बॉल टॅम्परिंग’चा आरोप, पंचांशी वाद घातल्याने इशान किशन अडचणीत
Constant changes in the states climate But wait for the winter
राज्यात थंडीची प्रतिक्षाच! पाऊस मात्र…
Maharashtra winter updates
Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज
belgaon black day marathi news
सीमा भागात काळा दिन; बेळगावात फेरीला प्रतिसाद
Mumbai air quality remains in moderate category
दिवाळीच्या दिवसांत मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच; कोणत्या भागातील हवा ‘अतिवाईट’?

दोन्ही संघ प्रथमच टी२० सामना खेळणार आहेत. याआधी, २००३ आणि २०११ विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांनी दोन वनडे सामने खेळले आहेत आणि दोन्ही प्रसंगी भारताने नेदरलँड्सचा पराभव केला आहे. अशा स्थितीत नेदरलँडला हरवणे भारतासमोर मोठे आव्हान नसले तरी रोहितच्या संघाला येथे मोठा विजय मिळवायचा आहे. विशेष म्हणजे जेव्हा-जेव्हा भारताने विश्वचषकामध्ये नेदरलँड्सचा पराभव केला आहे, तेव्हा टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे. २०११ मध्ये भारत चॅम्पियन बनला होता, तर २००३ मध्ये फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता.

भारत-नेदरलँड सामन्यादरम्यान हवामान कसे असेल?

भारत आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यादरम्यान हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, सामन्यादरम्यान पाऊस पडणार नाही आणि तापमान २४ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. मात्र, आकाश ढगाळ राहील. त्यामुळे पावसाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, ढगांची उपस्थिती वेगवान गोलंदाजांना मदत करेल. या सामन्यापूर्वी आणि नाणेफेक दरम्यान पाऊस पडू शकतो. यामुळे नाणेफेकीला उशीर झाला असला तरी नंतर पावसाची शक्यता नाही. अशा स्थितीत या सामन्याचा निकाल निश्चितच लागेल, अशी अपेक्षा केली जाऊ शकते.

कशी असेल खेळपट्टी?

या स्पर्धेतील पहिला सामना सिडनी येथे खेळला गेला आणि न्यूझीलंडने २०० धावा केल्या. या सामन्यातही तीच खेळपट्टी वापरली जाणार आहे. मात्र, ४० षटकांची जुनी खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अधिक उपयुक्त ठरेल. वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवरून जास्त उसळी किंवा वेग मिळणार नाही, परंतु स्लोअर बॉल अधिक प्रभावी ठरू शकतील. गोलंदाज गोलंदाजीत कधी स्लोअर, बाउन्सर, यॉर्कर अशाप्रकारचे बदल करत गोलंदाजी करतील तर अधिक यशस्वी होतील.

कधी, कुठं रंगणार सामना?

भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता, लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर, लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

नेदरलँड्स संघ

स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन अकरमन, शारीझ अहमद, लोगन व्हॅन बीक, टॉम कूपर, ब्रँडन ग्लोव्हर, टिम व्हॅन डर गुगटेन, फ्रेड क्लासेन, बास डी लीडे, पॉल व्हॅन मीकरेन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, स्टेफन मायबर्ग, तेजा निदामनुरु, मॅक्स ओ’डॉड, टिम प्रिंगल, विक्रम सिंग.